वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; उपद्रवामुळे शेतकरी हैरान
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील शिरोली येथील शेत शिवारात निलगाई कडपांनि गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून धुमाकूळ घातला असून या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैरान झाला आहे शेतकरी आपल्या शेतात खर्च करून कष्टाने जागविलेली पिके वन्यप्राण्यांकडून फस्त केली जात आहेत.शिरोली महागाव शेतशिवार जंगलाला लागून असल्यामुळे वन्य प्राणी सतत शेतामध्ये येत असतात.शेतातील धान पिके कोवळ्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासाडी केली जाते ,वन विभागाकडून नीलगाई वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.शेत शिवारात शेतकर्यांच्या शेतातील धान पिके आत्ताच लागवड केली असून धान पिके हिरवीगार झाली आहे.रात्री,अपरात्री रानडुकरांसह हरीण, सांबर, निलगायी अशा विविध जातींच्या वन्यप्राण्यांनी संपूर्ण शिवारात जंगल डोंगरमाथ्याच्या शेजारील शेतांमध्ये धुमाकूळ घातला. . बरेच शेतकरी रात्र जागून पिकाची राखण करीत आहेत.वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करत आहेत.वन्यप्राण्यांचे कळपांचे कळप शेतात येऊन नासाडी करण्यावाचून थांबत नाहीत.त्यामुळे शेतकर्यांचा घास हिरावला जातो .वन्यप्राण्यांकडून धान पिकांची नासाडी होत असल्याने शिरोली येथील शेतकरी संकटात सापडले आहेत.याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी तसेच वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी,अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.
पिकांचे नुकसान; उपाययोजनेची मागणी
शेतामध्ये धान पिकाची लागवड आत्ताच झाली असून धान पिके कोवळे हिरवेगार झाले आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून नीलगाई कडपांच्या धुमाकूळ सुरूच आहे आणि संपूर्ण शेत शिवार फस्त करीत आहेत आमच्या तोंडातील घास हिरावून घेत आहे यावर वन विभागाने नीलगाय वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.