शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार
कास्ट्राईब शिक्षक संघटनेला गटशिक्षणाधिकारी मेश्राम यांचे आश्वासन
गोंदिया : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया द्वारे दिनांक 4 ऑगष्ट 2025 रोज सोमवारला जिल्हाध्यक्ष संजय उके यांचे नेतृत्वात मा. एम. एल. मेश्राम गटशिक्षणाधिकारी पं. स. गोंदिया यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी साहेबांचे भारताचे संविधान व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठवण्यात यावे, शाळेच्या धोकादायक इमारती निरस्त करून शाळेला आवश्यक वर्ग खोल्या देण्यात याव्या, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शाळेला डेक्स बेंच पुरवण्यात यावे, शिक्षकांच्या सेवा पुस्तका अद्यावत करण्यात याव्या, सहाय्यक शिक्षक, विषय शिक्षक यांच्या रिक्त जागांची माहिती देण्यात यावी, शिक्षकांचे उच्च परीक्षा व कार्योत्तर परीक्षा परवानगी अर्ज मंजूर करण्यात यावे, भारतीय संविधान उद्देशिका छायांकित प्रत शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावे, शिक्षकांचे थकीत वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके मंजूर करण्या संबंधाने कारवाई करावी व इतरही मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, वीरेंद्र भोवते, किशोर डोंगरवार, रोशन गजभिये, आशिष रंगारी, अजय शहारे, शैलेश बागडे, उमेश नांदगाये, प्रशांत बडोले, धनंजय भोयर, सतीश टेंभेकर, नितीन अंबादे, अमित गडपायले, प्रदिप रंगारी व मोठ्या प्रमाणात संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.