progress School Gondia; प्रोग्रेसिव्ह इंग्लिश हायस्कूल मध्ये आरोग्य शिबीर संपन्न
गोंदिया : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येवुन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हर व एनसीडी कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.1 ऑगस्ट रोजी सिव्हिल लाईन्स ,गौतम नगर स्थित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश हायस्कूल येथे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केटीएस रुग्णालयातर्फे करण्यात आले होते.आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी एम.टी.एल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा उमादेवी तसेच डॉ.पंकज कटकवार व सचिव डॉ.नीरज कटकवार उपस्थित होते.त्यांनी आपल्या मनोगतातून कर्मचाऱ्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेतल्यास असंसर्गजन्य आजारांपासून बचाव शक्य असल्याचे सांगितले. या शिबिरात एकूण 115 कर्मचाऱ्यांची बीपी व रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनम जाधव यांनी बीपी व शुगरच्या नियमित तपासणीचे महत्व स्पष्ट केले.
यावेळी भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर यांनी व्यायामाचे व संतुलित आहाराचे महत्त्व कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले.योग्य आहार,नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली अंगीकारल्यास असंसर्गजन्य रोगांपासून सहज बचाव करता येत असल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये केटीएस रुग्णालयाचे ब्रदर मनोज राठोड, स्टाफ नर्स डिंपल राघोर्ते, तसेच प्रोग्रेसिव्ह शाळेतील ज्योती पशिने, ओ.टी.रहांगडाले, कुमुदिनी तावडे, विना कावडे, अभय गुरव, राहुल रामटेके व दिव्यांशु जैस्वाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या आरोग्य शिबिरामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबतची जाणीव वाढली असून, नियमित तपासणी व योग्य जीवनशैलीच्या अंगीकारामुळे आजारांची वेळेत ओळख होऊन उपचार शक्य होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.