Zp Gondia;गोंदिया जिल्हा भाजपा महामंत्रीपदी पंकज रहांगडाले यांची नियुक्ती
गोंदिया : भारतीय जनता पक्षाने गोंदिया जिल्हा महामंत्रीपदी पंकज रहांगडाले यांची नियुक्ती केली आहे. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. रहांगडाले यांनी या संधीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गोंदिया जिल्ह्यातील भाजपा नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
पंकज रहांगडाले यांनी सांगितले की, ही जबाबदारी त्यांच्यासाठी केवळ एक पद नसून, पक्षाच्या विचारधारा आणि जनसेवेच्या मूल्यांना गोंदिया जिल्ह्यात बळकट करण्याची संधी आहे. “मी पूर्ण निष्ठा, समर्पण आणि कर्तव्यदक्षतेने ही जबाबदारी पार पाडेन. गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या सहकार्याने आणि जनतेच्या विश्वासाने पक्षाच्या ध्येयाला गती देण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी नमूद केले. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या तत्त्वांवर आधारित, रहांगडाले यांनी गोंदिया जिल्ह्यातील जनतेच्या कल्याणासाठी आणि पक्षाच्या यशासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असलेले रहांगडाले यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एकजुटीने गोंदिया जिल्ह्यात भाजपाची ध्वजा आणखी उंच फडकवण्याचे आवाहन केले.