LatestNewsगोंदिया

गोंदियाच्या सुपुत्राची ‘केबीसी’च्या हॉटसीटवर धडक! विमल चौरसिया यांनी वाढविला जिल्ह्याचा नाव

लौकिकमहानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना देणार उत्तरे : आज ७ ऑक्टोबरला ‘सोनी टीव्ही’वर रंगणार ज्ञानकौशल्याचा थरार

गोंदिया : आपल्या बुद्धिमत्ता, अथांग ज्ञान आणि आत्मविश्वासाच्या बळावर गोंदियाच्या मातीतील सुपुत्राने देशातील सर्वात मोठ्या ज्ञानमंचावर ऐतिहासिक भरारी घेतली आहे. गोंदियाचे रहिवासी विमल रविशंकर चौरसिया यांनी ‘कोण बनेगा करोडपती’ (KBC-18) या नामांकित प्रश्नमंजुषा शोच्या हॉटसीटवर थेट महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसण्याचा बहुमान मिळवत संपूर्ण जिल्ह्याचा नावलौकिक देशभरात वाढविला आहे. चौरसिया यांचा हा प्रेरणादायी प्रवास आज, बुधवार ७ ऑक्टोबर रोजी रात्री ‘सोनी टीव्ही’वर प्रसारित होत आहे.गोंदियासारख्या छोट्या शहरातून निघून देशातील सर्वांत प्रतिष्ठेच्या ज्ञानपीठावर बिग बींच्या समोरील हॉटसीटपर्यंत पोहोचणे ही विमल चौरसिया यांच्या कष्टांची आणि चिकाटीची फलश्रुती मानली जात आहे. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीमुळे गोंदिया शहरासह संपूर्ण पूर्व विदर्भाची मान अभिमानाने उंचावली आहे.आज रात्री टीव्हीवर प्रसारित होणार भागविमल चौरसिया यांचा ज्ञानकौशल्याने भारलेला हा एपिसोड आज, ७ ऑक्टोबर रोजी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित केला जाणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील कोट्यवधी प्रेक्षक हा भाग पाहणार असून, आपल्या लाडक्या सुपुत्राचा खेळ आणि आत्मविश्वास पाहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकही प्रचंड उत्सुक आहेत.जिल्ह्याभरातून अभिनंदनाचा वर्षावस्थानिक नागरिक, मित्रपरिवार, युवा वर्ग आणि मान्यवरांनी विमल चौरसिया यांच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे. आजच्या भागाचा आनंद सर्वांनी टीव्हीवर एकत्र पाहून आपल्या शहराच्या या होतकरू युवकाचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन त्यांच्या शुभचिंतकांनी केले आहे. विमल चौरसिया यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील प्रवासासाठी उदंड यश चिंतले जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *