गणखैरा केंद्रस्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी आयोजित होत असलेल्या अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या गणखैरा केंद्रस्तरीय स्पर्धांचा उद्घाटन सोहळा गुरुवारी पीएम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, तुमखेडा बूज येथे अत्यंत दिमाखात संपन्न झाला.
या महोत्सवाला संबोधित करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा महामंत्री श्री. पंकज रहांगडाले यांनी सांगितले की, “मी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हा महोत्सव सुरू करण्याचा पुढाकार घेतला होता. विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रमातच नव्हे तर क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही प्रावीण्य मिळावे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील मुलांना आपली कला व कौशल्य केंद्रस्तरावर आणि नंतर जिल्हास्तरावर सादर करण्याची मोठी संधी मिळते. हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना देईल.”
सध्या जिल्ह्या जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर केंद्रस्तरीय स्पर्धा जोरात सुरू आहेत. यातून निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये लवकरच जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य श्री. जितेंद्रजी कटरे, पंचायत समिती गोरेगाव सभापती सौ. चित्रकलाताई चौधरी, सौ. नलिनीताई सोनवाने, श्री. कृष्णकुमारजी रहांगडाले, श्री. घनश्यामजी पटले, श्री. भोजराजजी ठाकूर, श्री. रंजूकुमार येळे, श्री. मुकेशजी बेलगे, श्री. हिवराजजी बनसोड, श्री. अनुरागजी सरोजकर, डॉ. श्री. गणेशजी बघेले, सौ. किरणताई पारधी, सौ. भूमेश्वरीताई रहांगडाले, श्री. जयेंद्रजी धमगाये, श्री. दिनेशजी कटरे, सौ. त्रिवेणीताई शरणागत, श्री. राजेशजी तुमसरे, श्री. नरेंद्रजी राऊत यांच्यासह गणखैरा केंद्रातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा महोत्सव यंदाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे चित्र दिसते आहे.

