LatestNewsगोंदिया- भंडारा

साकोलीच्या सरकारी गोदामातून ३६१ कट्टे तांदूळ चोरी; १० संशयितांना अटक

५० टक्के माल जप्त!५.४१ लाखांच्या तांदळावर हातसाफ : पिकअप जप्त, २ दिवसांची पोलीस कोठडीसाकोली पोलिसांची धडक कारवाई

साकोली (भंडारा): साकोली शहरातील लाखांदूर फाटा येथील सरकारी धान्य गोदामातून गरीबांच्या वाटपाचा तब्बल ३६१ कट्टे (पोती) तांदूळ चोरीला गेल्याच्या प्रकरणात साकोली पोलिसांनी धडक कारवाई करत १० संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. सुमारे ५ लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीच्या या तांदूळ चोरी प्रकरणात पोलिसांनी आरोपींकडून ५० टक्के माल आणि महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 35 AJ 5170) जप्त केली आहे.गोदाम व्यवस्थापक दीपक नानाजी चौधरी (वय ४७, रा. तलाव वार्ड, साकोली) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोदामाच्या मागील शटरचे नट-बोल्ट काढून आत प्रवेश करत ५० किलो वजनाची ३६१ पोती तांदूळ पळवला होता.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये २ राईस मिल मालक! पोलिसांनी या प्रकरणात कोसमतोंडी येथील महेंद्र शिवबरन चौधरी, महेश विकास पुसाम, दीपक दवन वाघाडे, निकेश देवराम बावणकर, गोवर्धन चिंधुजी सयाम, प्रदीप नंदकुमार बोधनकर, वडेगाव येथील नारायण नामदेव गाहाणे, गिरोला-हेटी येथील संजयकुमार भय्यालाल पुस्टोडे, साकोली येथील राकेश दयाराम आगासे आणि नवेगावबांध येथील रितेश रविशंकर जैसवाल यांना ताब्यात घेतले आहे. यातील संजयकुमार पुस्टोडे आणि रितेश जैसवाल हे राईस मिल चालक असून, चोरीचा सरकारी तांदूळ खरेदी-विक्री करण्यात त्यांचा काय सहभाग होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.२ दिवसांची पोलीस कोठडी; सुरक्षेवर प्रश्नचिन्हन्यायालयाने सर्व १० आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी साकोली पोलीस ठाण्याला भेट देऊन ठाणेदार महादेव आचरेकर व तपास अधिकारी किशोर मानकर यांच्या कामगिरीचे कौतुक केले व पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले.दरम्यान, सरकारी गोदामाची सुरक्षा आणि स्टॉकच्या देखरेख व्यवस्थेवर या घटनेमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि यात काही प्रशासकीय साखळी आहे का, याचा शोध साकोली पोलीस घेत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *