LatestNewsगोंदियाराष्ट्रीय

वयोवृद्धांचा आशीर्वाद हेच संघटनेच्या विकासाचे फळ : एल. यु.खोब्रागडे

राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे जिल्हा अधिवेशन

वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार

गोंदिया (नवचैतन्य) : ‘पेंशनरांची सेवा हीच ईश्वर सेवा’ हे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे ब्रीदवाक्य आहे. संघटनेच्या स्थापनेला ३ वर्षे पूर्ण झाली असून, या कमी कालावधीत संघटनेचे एका छोट्याशा रोपट्यापासून वटवृक्षात रूपांतर झाले आहे. वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच संघटनेचा हा विकास शक्य झाला आहे, असे प्रतिपादन संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष एल. यु. खोब्रागडे यांनी केले.संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ७ सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हा अधिवेशनात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

या शुभप्रसंगी ७५ वर्षांवरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण गुणगौरव करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या छबूताई उके होत्या. तर उद्घाटक म्हणून आमगाव विधानसभेचे आमदार संजय पुराम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश हर्षे, सालेकसा पं.स. सभापती वीणाताई कटरे, आमगाव पं.स. सभापती योगीताताई पुंड, उपसभापती सुनंदाताई उके, सालेकसाचे खंडविकास अधिकारी संजय पुरी, नगरसेवक पी. आर. पारधी, आर. आर. अगडे, शारदा सांगोळे यांची उपस्थिती होती.तसेच चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष गणपत विधाते, सचिव बोंडे, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष मडावी, सचिव मस्के, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ आंबुलकर, संघटनेचे सचिव पी. एन. बडोले, कोषाध्यक्ष डी. एल. गुप्ता, उपाध्यक्ष टी. बी. भेंडारकर, डी. बी. चौधरी, शिक्षक समितीचे नेते किशोर डोंगरावर, संदीप तिडके, एन. बी. बिसेन यांच्यासह इतर पदाधिकारी व हजारो सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे उपाध्यक्ष पी. बी. लांजेवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आमगावचे सचिव बी. एस. सोनवाने यांनी मानले. अधिवेशनाला गोंदिया जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ सेवानिवृत्तांचा सत्कार

अधिवेशनादरम्यान विविध क्षेत्रांत प्रदीर्घ सेवा दिलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शिवलाल लिल्हारे, हुलचंद लिल्हारे, कालुराम बहेटवार, टी. जी. बहेटवार, श्यामलाल कटरे, सी. आर. भास्कर, गणेश बनोठे, मिठ्ठूलाल उके, श्यामलाल बावनथडे, लीलाबाई पंधरे, नत्थेलाल गौतम, हरिराम भांडारकर, कारू येटरे, नामदेव राहांगडाले, बुधराम हत्तीमारे, लक्ष्मण मेंढे, दादू बिसेन, कमलाबाई मुनेश्वर, सुदामा पटले, रेवचंद क्षीरसागर, के. टी. लिल्हारे, सरस्वाता सूर्यवंशी, प्रेमलाल भगत आणि आर. सी. बोरकर यांचा समावेश होता.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *