सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करु -आमदार संजय पुराम
सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या तिस-या जिल्हा अधिवेशनात केले मार्गदर्शन
आमगांव (नवचैतन्य गोंदिया) : सेवानिवृत्त कर्मचारी सेवेतून मुक्त झाल्यानंतर त्यांचे शरीर शिथील होते. ते शारिरीक दृष्ट्या कमजोर होतात. अशा स्थितीत आपण संघटनेच्या माध्यमातून त्यांचे कार्य करीत असता, सेवा करीत असता. तरीपण त्यांचे प्रश्न शासन व जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबीत असतात. या प्रलंबीत समस्या निकाली काढण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करु, अशी ग्वाही आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना जिल्हा शाखेचे तिसरे जिल्हा अधिवेशन व सेवानिवृत सत्कार सोहळा 7 सप्टेंबर रोजी शुभमंगलम लाॅन येथे पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी जिल्हा परिषद सदस्या छबूताई उके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि प. उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश हर्षे, आमगांव पंचायत समिती सभापती योगीताताई पुंड, उपसभापती सुनंदाताई उके, सालेकसा चे सभापती वीणाताई कटरे, सालेकसाचे खंड विकास अधिकारी संजय पुरी, सहाय्यक खंड विकास अधिकारी पियूष सोमकुवर, नगर सेविका शारदाताई सांगोळे, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पी .आर. पारधी, जिल्हाध्यक्ष एल .यु .खोब्रागडे, सचिव पी. एन.बडोले, मार्गदर्शक मनोज दिक्षित, आर.आर.अगडे, जिल्हा उपाध्यक्ष टी.बी. भेंडारकर, डी.एल. गुप्ता, जी. ई .येळे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष मडावी, सचिव मस्के, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गणपत विधाते सचिव सुरेश बोंडे, उपाध्यक्ष नामदेव गावतुरे, विजय भोगेकर, अमरावती जिल्हाध्यक्ष एकनाथ आंबुलकर, महिला प्रतिनिधी मनूताई उके, रेखा बोरकर, इंदु उके, विद्याताई अवधूत, गिता कोरे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून संघटनेची वाटचाल व सेवानिवृत कर्मचा-यांच्या समस्या मांडून त्या मार्गी लावण्याठी मागणी केली. प्रमुख अतिथी योगीताताई पुंड, वीणाताई कटरे, सुनंदाताई उके, जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्षे व जि.प.सदस्या छबूताई उके यांनी जिल्हा परिषद व शासन स्तरावर सभा लावून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन आपल्या भाषणातून दिले. व कार्यक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष पी. बी .लांजेवार यांनी तर आभार प्रदर्शन आमगांव तालुका सचिव बी. एस. सोनवाने यांनी केले.
या प्रसंगी 75 वर्षावरील 30 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संघटनेचे एस. एम .येळे, डी .सी. तुळसीकर, डी. एम .दखने, डी. बी. चौधरी, एच .पी .पटले, एन .एस .कोरे, अंबर बिसेन, झमाल उके, सुरेश आष्टीकर, जे. बी. क-हाडे, सी.के निनावे, डी.एन.गोलीवार, एच आर.चन्ने, रमेश गहाणे, पी.एल पारधी, नरेंद्र कारंजेकर, दिक्षा फुलझेले, कविता चक्रवर्ती, वर्षा बडवाईक, ईमला बिसेन व बहुसंख्य सेवानिवृत शिक्षक व आरोग्य सेविका यांनी अथक परिश्रम घेतले.

