नवी जबाबदारी विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवू : खा.राजेंद्र जैन
राष्ट्रवादी काँग्रेस सदैव शेतकर्यांच्या पाठीशी
आमगाव : येणार्या काळात ग्रामपंचायत निवडणुक असून प्रत्येक कार्यकर्त्याने आत्मविश्वासाने आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरे जावे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी गावागावात संपर्क वाढवून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसोबत सदैव उभा राहील, असे प्रतिपादन खासदार राजेंद्र जैन यांनी केले.

तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजया लक्ष्मी सभागृहात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान सत्काराला उत्तर देताना खा.राजेंद्र जैन बोलत होते. जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तूरकर, माजी म्हाडा सभापती नरेश कुमार माहेश्वरी, सुरेश हर्षे, केतन तुरकर आदि मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी खासदार राजेंद्र जैन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार राजेंद्र जैन म्हणाले की, खासदारपदी निवड झाल्यामुळे क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी अधिक वाढली आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजूर यांच्या पाठीशी सदैव उभे राहून त्यांच्या हितासाठी कार्य केले आहे. नेहमीच शेतकर्यांना बोनस व कर्जमुक्ती मिळावी या दृष्टीने सकारात्मक पाठपुरावा केला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत पुढे अधिक जोमाने करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला कमलबापू बहेकार, राजेश भक्तवर्ती, टीकाराम मेंढे, विनोद कन्नमवार, जियालाल पंधरे, अनिल शर्मा, गणेश हर्षे, पियूष झा, सुभाष यावलकर, चुन्नीलाल शहारे, संजय रावत, रवि क्षिरसागर, स्वप्नील कावडे, रवींद्र मेश्राम, लोकनाथ हरिणखेडे, महेंद्र राहांगडाले, प्रमोद शिवणकर, गिरी महाराज, तुलेंद्र कटरे, सीमाताई शेंडे, कविता राहांगडाले, शिलाताई ब्राह्मणकर, उषाताई हर्षे, लक्ष्मीताई येडे, रुपालीताई भक्तवर्ती, शिलाताई चुटे, सिंधूताई भुते, निलेश्वरी गौतम, उषाताई डोंगरे, कांताबाई रहिले, गायत्री कटरे, संतोष श्रीखंडे, बबलू बिसेन, उमेश बिसेन यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

