LatestNewsविदर्भ

नागपुरात रेती व्यापाऱ्याची निर्घृण हत्या; दारू पार्टीनंतर जुन्या वादातून रचला थरारक कट!

दगड आणि धारदार शस्त्रांनी वार करून केला खून; अवघ्या काही तासांत ३ आरोपींना ठोकल्या हत्कड्या

नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी एक थरारक अन् मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तुमसर येथे रेतीचा व्यवसाय करणारे मनीष उर्फ मन्या चंद्रशेखर मोहिते (वय ३८, रा. महाल) यांची जुन्या वादातून दगड आणि धारदार शस्त्रांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. मनीष यांचा रक्ताने माखलेला मृतदेह इतवारी, धारस्कर रोडवरील कसार भवनासमोर असलेल्या एका चहाच्या टपरीतील लोखंडी टेबलावर पडून आढळला.सकाळी टपरी संचालक अमित पौनीकर यांनी दिलेल्या माहितीवरून तहसील पोलीस आणि क्राइम ब्राँच युनिट-३ चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपासाचे चक्र वेगाने फिरवले.क्राइम ब्राँचकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; ३ आरोपी गजाआडक्राइम ब्राँच युनिट-१ आणि सायबर सेलने ‘सिंबा’, ‘नेटग्रिड’, AI तंत्रज्ञान आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयितांची नाकेबंदी केली. एमआयडीसी आणि लकडगंज परिसरातून तीन आरोपींना अवघ्या काही तासांत शिताफीने अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:कुणाल झाडे (वय ३०, रा. चितारओली)विनय उर्फ डालू पौनीकर (वय ३५, रा. धारस्कर रोड)निखिल चव्हाण (वय २५, रा. जुनी मंगळवारी)प्राथमिक चौकशीत आरोपींनी जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हत्येचा कट रचल्याची कबुली दिली आहे.दारू पार्टीनंतर मध्यरात्री घडवला हत्याकांडपोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मनीष मोहिते यांनी त्यांचा भाऊ रोशन उर्फ गोलू मोहिते याला झेंडा चौक येथील ‘व्हाइट हाउस बार’मध्ये बोलावले होते. तेथे मनीष, निखिल, कुणाल आणि विनय यांनी मिळून दारू प्यायली. त्यानंतर सर्वजण दुचाकीने बाहेर पडले. मध्यरात्रीच्या सुमारास संधी साधून आरोपींनी मनीष यांच्यावर धारदार शस्त्रांनी व दगडाने प्राणघातक हल्ला चढवून त्यांना जागीच ठार केले. रविवारी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सध्या तहसील पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *