Jain Kalar Samaj : समाज सुसंस्कृत करण्याला महत्व द्यावे : चंद्रशेखर आदमने
जैन कलार समाजाची सहविचार सभा संपन्न
गोंदिया : समाजाचे काम करीत असतांना समाजातील लोकांना आपल्या आचारविचार प्रदान करण्यासाठी एक मंच असणे आवश्यक आहे. त्यासाठी भवन निर्मितीची रुपरेखा आखली जाते, आणि ते आवश्यक देखील आहे. परंतु, आजघडीला समाज भवनाच्या भौतीक सुविधेबरोबर समाज सुसंस्कृत करण्यास महत्त्व देणेही गरजेचे झाल आहे, असे मत जैन कलार समाज (Jain Kalar Samaj) मध्यवर्ती मंडळ नागपूरचे केंद्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आदमने यांनी व्यक्त केले.
जैन कलार समाज सांस्कृतिक भवनात जैन कलार समाज (Jain Kalar Samaj) गोंदिया व जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ नागपूरची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी जैन कलार समाजाचे जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून (Jain Kalar Samaj) जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ नागपूरचे अध्यक्ष चंद्रशेखर आदमने, कार्तिक शेंडे, रविकांत हरडे, शशिकांत समर्थ, विलास हरडे, विनोद खानोरकर, शालिकराम लिचडे, तेजराम मोरघडे, शोभेलाल दहिकर व भैयालाल मोरघडे प्रामुख्याने उपस्थित होते. सभेत उपस्थित पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर समाजाचे अध्यक्ष एल.यु.खोब्रागडे यांनी प्रास्ताविकेतून गोंदिया येथील समाज भवनाच्या समस्या व सुरु असलेल्या समाज बांधकामाबद्दल सविस्तर माहीती दिली. तसेच समाजभवनासाठी आर्थिक सहाय्य करावे, अशी विनंती केली.
कार्यक्रमाचे संचालन उमेश भांडारकर तर आभार प्रदर्शन वरुण खंगार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ( Jain Kalar Samaj ) समाजाचे सुखराम हरडे, मनोज भांडारकर, अतुल खोब्रागडे, संजय मुरकुटे, नामदेव सोनवाने, मनोज किरनापूरे, धनपाल कावळे, गोपाल हजारे, रोशन दहीकर, योगेश ईटानकर, वासु सोनवाने, राजकुमार पेशने, सचिन पालांदूरकर, सुशील शेंदरे, शिवाजी सोनवाने, देवानंद भांडारकर, दौलत मोरघडे, अशोक भांडारकर, विजय सोनवाने, ज्योती किरणापूरे, वीणाताई सोनवाने, हर्षा आष्टीकर, वर्षा तिडके, रविकांता इटानकर, अर्चना सोनवाने, कविता लिचडे, वत्सला पालांदूरकर यांनी परिश्रम घेतले.
मान्यवरांकडून समाजाला देणगी : सभेत उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांपर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. तसेच समाजाला आर्थिक सहयोग म्हणून चंद्रशेखर आदमने यांनी ५१ हजार, कार्तीक शेंडे ५१ हजार, विलास हरडे ११ हजार, राजेश पालांदूरकर ११ हजार, रविकांत हरडे यांनी ११ हजाराची देणगी दिली. तर इतर कार्यकारिणी सदस्यांनी देणगी देण्याची कबुली दिली. या शिवाय इतर समाजोपयोगी विषयावर चर्चा करण्यात आले.

