LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

राहुल गांधींवरील कारवाईचा गोंदियात तीव्र निषेध; जिल्हा काँग्रेसने राष्ट्रपतींना पाठवले निवेदन!

हल्द्वानी प्रकरणी भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदवण्याची मागणी
गोंदिया : गोंदिया: उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभास्थळाचे भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित शुद्धीकरणाचा आणि याविरोधात आवाज उठवणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्द्वानी पोलिसांत एफआयआर नोंदवल्याचा गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध केला आहे. या संदर्भात गोंदिया उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन पाठवून राहुल गांधींवरील कारवाई मागे घेण्याची व दोषी भाजप कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
उत्तराखंड येथील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभास्थळाचे भाजप व आरएसएस कार्यकर्त्यांकडून कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या निंदनीय घटनेचा गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या घटनेविरोधात ठाम भूमिका घेत आवाज उठवणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरच हल्द्वानी कोतवाली पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हल्द्वानी येथील घृणास्पद प्रकारातील दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी उलट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरच चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत आणि सभास्थळाचे कथित शुद्धीकरण करून द्वेष पसरवणार्‍या उत्तराखंडातील भाजप व आरएसएस कार्यकर्त्यांवर त्वरित एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
निवेदन देताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे पी.जी.कटरे, रमेश आंबुले, जीवनलाल शरणागत, आकाश फुंडे, जहीर भाई अहमद़, डेमेंद्र रहांगडाले, मनिष मेश्राम, राजकुमार (पप्पू) पटले, रणजीत गणवीर, मनोज पटनायक, आनंद लांजेवार, डी. एन. येडे, राजू चामट, हितेंद्र जांभूळकर, कृपाल लिल्हारे, भूपेंद्र हरिणखेडे, अरमान जायसवाल, यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते निषेध मोर्चात व निवेदन देण्याच्या वेळी उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *