गोंदियातील ‘करिअर झोन’च्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग भरारी!
७० हून अधिक भावी डॉक्टर तर १४० हून अधिक इंजिनिअर
२२ नोव्हेंबरला भव्य सत्कार, २९ ला शिष्यवृत्ती परीक्षा
गोंदिया : गोंदियातील नामवंत शैक्षणिक संस्था ‘करिअर झोन’च्या विद्यार्थ्यांनी २०२६ च्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमध्ये ऐतिहासिक आणि दैदिप्यमान यश संपादन केले आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी ‘नीट’ (NEET) परीक्षेत बाजी मारत शासकीय व नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस (MBBS) प्रवेश मिळवला आहे, तर आयआयटी-जेईई आणि एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षेद्वारे तब्बल १४० हून अधिक विद्यार्थ्यांनी देशातील व राज्यातील अव्वल अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवला आहे. या घवघवीत यशाची माहिती करिअर झोनचे संचालक रोहित झा यांनी ५ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना संचालक रोहित झा यांनी सांगितले की, दर्जेदार अध्यापन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे संस्थेने यंदा यशाचा नवा उच्चांक गाठला आहे. जेईई (IIT-JEE) परीक्षेत काउन्सिलिंगनंतर करिअर झोनच्या ४० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या आयआयटी (IIT), एनआयटी (NIT) आणि ट्रिपल आयटी (IIIT) या संस्थांमध्ये झाली. यातील ३४ विद्यार्थ्यांनी थेट या राष्ट्रीय संस्थांमध्ये प्रवेश घेतला असून, अंतराच्या अडचणीमुळे ५ ते ६ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील नामांकित उच्च तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. याशिवाय, महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेच्या (MHT-CET) माध्यमातून जवळपास १०० विद्यार्थ्यांनी राज्यातील अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालयांत आपले स्थान पक्के केले आहे.
विद्यार्थी आणि पालक हेच खरे ‘नायक’: २२ नोव्हेंबरला भव्य गौरव सोहळा
या दैदिप्यमान यशाचे संपूर्ण श्रेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देताना रोहित झा म्हणाले, “आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणारे आई-वडील आणि जिद्दीने अभ्यास करणारे विद्यार्थी खऱ्या अर्थाने या गोंदिया शहराचे खरे नायक आहेत.” या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी येत्या २२ नोव्हेंबर रोजी विदर्भातील विविध क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी २९ नोव्हेंबरला विशेष ‘स्कॉलरशिप टेस्ट’
आगामी २०२७ च्या शैक्षणिक सत्राची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर झोनतर्फे २९ नोव्हेंबर २०२६ रोजी एका विशेष शिष्यवृत्ती परीक्षेचे (Scholarship Test) आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा सध्या १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या महाराष्ट्र राज्य मंडळ (State Board), सीबीएसई (CBSE) तसेच इतर सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी खुली राहणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना आगामी सत्रातील प्रवेश फीमध्ये मोठी सवलत दिली जाणार आहे.
आर्थिक अडचणींमुळे कोणतीही गुणवत्ता शिक्षणापासून वंचित राहू नये, ही करिअर झोनची कायम भूमिका राहिली आहे. ज्या गुणवंत विद्यार्थ्यांची कौटुंबिक आर्थिक स्थिती बिकट आहे, अशा सर्व गरजू व हुशार विद्यार्थ्यांना संस्था दरवर्षीप्रमाणे यंदाही पूर्ण ताकदीने शैक्षणिक व आर्थिक सहकार्य पुरवेल, अशी ग्वाही संचालक रोहित झा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेला स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

