HealthLatestगोंदियागोंदिया- भंडारा

प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा ११ वा स्थापना दिन व सत्कार सोहळा १ सप्टेंबर रोजी

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार ‘जिल्हा गौरव’ पुरस्कारांनी सन्मान
गोंदिया: पत्रकारिता क्षेत्रात विश्वास, सत्य आणि एकजुटीचे प्रतीक ठरलेल्या ‘प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया’ च्या स्थापनेला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्थेचा ११ वा स्थापना दिन व भव्य सत्कार सोहळा मंगळवार, ०१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता हॉटेल जिंजर (द गेटवे) येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचे अध्यक्ष अपूर्व मेठी भूषवतील. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य व माजी मंत्री आ. डॉ. परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार राजकुमार बडोले,आमदार विजय राहांगडाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर व नगराध्यक्ष सचिन शेंडे उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार भगत ठकरानी यांना ‘प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया जीवन गौरव सन्मान २०२६-२७’ प्रदान करण्यात येईल. यासोबतच दुलिचंद बुद्धे यांना स्व. श्री. रणजीतभाई जसानी स्मृती सामाजिक सेवा सन्मान, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रूपेशकुमार राऊत यांना स्व. श्री. रामकिशोरजी कटकवार स्मृती कर्तव्यनिष्ठ सन्मान, प्रा. सत्यनारायण यदुवंशी यांना स्व. श्री. रामदेवजी जायस्वाल स्मृती साहित्यरत्न सन्मान, दादा फुंडे यांना स्व. श्री. मोहनलालजी चांडक स्मृती कृषीरत्न सन्मान, नरेंद्र गौतम यांना सहयोग संस्थान द्वारे शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान, दिव्या नितीन भोजवानी यांना स्व. श्री. दीपम देवेंद्रभाई पटेल स्मृती योगरत्न सन्मान, डॉ. श्री. सुधीर जोशी यांना स्व. प्राचार्य श्री. योगेश नासरे स्मृती विशेष सेवा सन्मान आणि वृक्षधारा फाऊंडेशनला स्व. श्री. रूपनारायण झा स्मृती विशेष सन्मान प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.
या गौरव सोहळ्यास जिल्ह्यातील पत्रकार, नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष जयंत शुक्ला, संतोष शर्मा, सचिव रवी आर्य, कोषाध्यक्ष हिदायत शेख यांच्यासह कार्यकारिणी सदस्य अंकुश गुंडावार, कपिल केकत, हरिंद्र मेठी, आशिष वर्मा, जाहीद खान, मुकेश शर्मा, राजन चौबे, नरेश रहिले, रवींद्र तुरकर, संजीव बापट, राहुल जोशी, मनोज ताजणे, योगेश राऊत व समस्त प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *