LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया- भंडारा

अवैध दारूविरोधात आबकारी विभागाचा दणका; १३ पेट्या दारूसह आरोपीला अटक, रवानगी तुरुंगात!

गोंदिया (प्रतिनिधी) : बालाघाट जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार सत्यम यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा आबकारी अधिकारी अजित एक्का यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची निर्मिती, साठा व विक्री करणाऱ्यांविरोधात आबकारी विभागाने विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत आबकारी वर्तुळ लांजीच्या पथकाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी मौजा कोचेवाही येथे छापा टाकून एका आरोपीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.
आबकारी विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून १३ पेट्या देशी व विदेशी दारू (एकूण ११८.७६ बल्क लिटर) हस्तगत करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या या दारूची अंदाजे बाजारपेठ किंमत ५० हजार रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी :
या प्रकरणी आरोपीविरोधात मध्य प्रदेश आबकारी अधिनियम, १९१५ च्या कलम ३४(१)(क) आणि ३४(२) अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. आरोपीला माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत (तुरुंगात) केली आहे. ही कारवाई आबकारी वर्तुळ प्रभारी कौस्तुभ नेताम, आरक्षक राहुल महोबिया आणि कपिल टांडेकर यांच्या पथकाने केली. जिल्ह्यात अवैध दारूचा साठा व विक्री करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरूच राहील, असा इशारा आबकारी विभागाने दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *