LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

पोहण्यास गेलेला २० वर्षीय युवक तलावात बुडाला!

आष्टी (शहीद) येथील धक्कादायक घटना
आष्टी (शहीद), वर्धा:
स्थानिक गणेशपुरा परिसरातील २० वर्षीय तरुण मित्रांसोबत तलावात पोहण्यास गेला असता अचानक पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी, १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० ते ४.०० वाजताच्या सुमारास घडली. सौरव सुनील चचाने असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सौरव हा आपल्या मित्रांसोबत परिसरातील तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या मित्रांनी व स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण केले. सायंकाळपर्यंत बचाव पथकाकडून तलावात सौरवचा युद्धपातळीवर शोध सुरू होता.
धोकादायक ठिकाणी जाणे टाळाण्याचे आवाहन:
पावसाळ्याच्या दिवसांत तलाव, नदी किंवा जलाशय परिसरात पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी आणि धोकादायक ठिकाणी पोहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बचाव पथकाच्या शोधमोहीमनंतरच या घटनेबाबत पुढील अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *