LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदियात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका!

युवक काँग्रेस व NSUI कडून ‘युवा उत्सव दिवस’ साजरा; ७५ युनिट रक्तदान, वृक्षारोपण, फलवाटप अन् साहित्य वाटप!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री व खासदारांकडून फोनवरून शुभेच्छा; जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची तोबा गर्दी!

गोंदिया : गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण गोंदिया जिल्हाभरात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी गोंदिया जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआय (NSUI) च्या वतीने हा दिवस ‘युवा उत्सव दिवस’ म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली.

रक्तदान, वृक्षारोपण अन् रुग्णसेवेने वाढदिवस साजरा

वाढदिवसाचे औचित्य साधून दिवसभर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले:पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण: पंचायत समितीजवळील आंबेडकर चौक येथे ‘प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट’ व शहराध्यक्ष सचिनभाऊ शेंडे यांच्या वतीने नागरिकांना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच ‘श्रीराम वृक्षारोपण आयोजन समिती’तर्फे गोंदिया शहर पोलीस ठाणे परिसरात पूर्व आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.७५ युनिट रक्तदान: शासकीय बीजीडब्ल्यू रुग्णालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात युवक काँग्रेस व NSUI च्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तब्बल ७५ युनिट रक्तदान केले.फळ वाटप व शैक्षणिक साहित्य: गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शासकीय केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तर नगर परिषद शाळा मटारटोली व रामनगर शाळेतील विद्यार्थ्यांना वही-पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री, राज्यस्तरीय नेते अन् खासदारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

:गोपालदास अग्रवाल यांना फोनवरून शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राज्यसभा खासदार प्रफुल पटेल, खासदार प्रशांत पडोले, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, राज्यसभा खासदार राजेन्द्र जैन, माजी खासदार विजय दर्डा, माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार परिणय फुके, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार विजय रहांगडाले, माजी मंत्री सुनील केदार, माजी आमदार रमेश कुथे यांच्यासह अनेक मंत्री व वरिष्ठ लोकप्रतिनिधींचा समावेश होता.

जनसंपर्क कार्यालयात मान्यवरांची मांदियाळी

गोंदिया येथील जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ बन्सोड, पुरुषोत्तम (बाबा) कटरे, वंदना काळे, सचिनभाऊ शेंडे, राकेश ठाकूर, शिवसेना जिल्हाध्यक्ष पंकज यादव, अशोक इंगळे, संजय टेंभरे, दीपक कदम, राधेलाल पटले, राजेश नंदागवळी, बंटीभाऊ कटरे, अशोक गुप्ता, अरुणकुमार दुबे, विजयसिंग राठोड, अशोक चौधरी, जितेश राणे, झामसिंगभाऊ बघेले, डॉ. योगेंद्र भगत, गोपीचंद धावानी, वेदप्रकाश अग्रवाल, हुकुमचंद अग्रवाल, सीताराम अग्रवाल, महेश गोयल, निलेश अग्रवाल, हेमेन्द्र पोद्दार, राम अग्रवाल, शंकरलाल अग्रवाल, किरणकुमार मुंदडा, अपूर्व अग्रवाल, अशोक अग्रवाल, महेश अग्रवाल, योगेश (बापू) अग्रवाल, संजय जैन (लाडली), अमन रोगठिया, जमीलभाई खान, संदीप भाटीया, जितेन्द्र कटरे, लक्ष्मी तरोने, विजय उके, ॲड. हर्षवर्धन भादपोते, रमेश अंबुले, सुशीलाताई भलेराव, संजय गावडे, अमित झा, नंदभाऊ बिसेन, शेपराव गिरीपुंजे, डॉ. दीपक बाहेकर, उपाताई मेढे, विमल नागपूरे, पी. जी. कटरे, प्रकाश रहमतकर, विनोद बिसेन, भास्करभाऊ रहांगडाले, मनिष मेश्राम, संतोष घरसेले, शोभेलल पारधी, माधुरी हरिणखेडे, चमनलाल बिसेन, दरयानो आसवानी, साजनदास वाधवानी, मनोज पटनायक, अंकित जैन, देवेन्द्र तिवारी, उमाशंकर हारोडे, उमेश असाटी, गिरधर बिसेन, शकील मंसूरी, लोकेश (कल्लू) यादव, सनी शेडे, चेतना पराते, अफसानाताई पठाण, क्रांतीकुमार जायसवाल, देवा रुसे, भागवत मेश्राम, विजय लोणारे, अशोक गंजे, रमेशकुमार लिलहारे, सुरजलाल महारवाडे, देवचंद नागपुरे, संदीप रहांगडाले, सुरेखाताई भंडारकर, डॉ. नंदकुमार जायसवाल, डॉ. तेजराम येडे, रवी अग्रवाल, कुंदाताई चंद्रिकापुरे, नागेश दुबे, सुरेशजी चौरागडे यांच्यासह सर्व स्तरांतील नागरिक, विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *