LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

थाई बॉक्सिंगमध्ये गोंदियाच्या खेळाडूंचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत पदकांची लयलूट;

१८ खेळाडूंचे ‘नॅशनल’चे तिकीट पक्केछत्रपती संभाजीनगर येथे झाली स्पर्धा; ऑगस्ट महिन्यात नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

गोंदिया: ऑल इंडिया थाई बॉक्सिंग फेडरेशनच्या तत्वावधानात २५ आणि २६ जुलै २०२६ रोजी विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. या स्पर्धेत गोंदियाच्या खेळाडूंनी विविध पदकांची लयलूट करत आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी (National Championship) आपले तिकीट पक्के केले आहे.या प्रतिष्ठित राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे १५ जिल्ह्यांतील ४०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

महाराष्ट्र थाई बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष नबीज फरहान सर, सचिव जमील चिकलगर आणि संयोजक प्रकाश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा सचिव राजू पी. चौराकडे उपस्थित होते.गोंदियाचे पदकविजेते खेळाडू:सुवर्णपदक (Gold Medal): जीवेश कामडे (आदर्श भारत पब्लिक स्कूल), कार्तिकेय गतपायले (प्रोग्रेसिव्ह स्कूल), श्रेयशी अगडे (निर्मल इंग्लिश स्कूल), राजवीर मडावी आणि ओजस कोठारी. रजतपदक (Silver Medal): सम्यक खोब्रागडे. कांस्यपदक (Bronze Medal): दर्श धावडे (पोदार इंटरनॅशनल स्कूल), विहान मेश्राम (स्टार इंटरनॅशनल स्कूल), अथर्व भोगे (आर्किटेक्ट पब्लिक स्कूल), नित्या मेहर, मंथन देसाई, अश्विनीकुमार शुक्ला, अथर्व कवाले आणि नयन चुटे.सर्व पदकविजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र थाई बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष वाजिद शेख यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत गोंदियाचे भुवनेश्वर राहले व लिओज राजू चौराकडे यांनी पंच (रेफरी) म्हणून, तर राजू पी. चौराकडे यांनी संघ व्यवस्थापक (टिम मॅनेजर) व ज्युरी सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या गोंदियाच्या १८ खेळाडूंची निवड आगामी राष्ट्रीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी झाली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान नांदेड येथे आयोजित केली जाणार आहे. खेळाडूंच्या या दैदीप्यमान यशाबद्दल डॉ. निलेश जैन, डॉ. लता जैन, डॉ. नोहविल ब्राह्मणकर, नगरसेवक पंकज यादव, शहराध्यक्ष सचिनभाऊ शिंदे, नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव तसेच प्रहार थाई बॉक्सिंग असोसिएशन, गोंदियाच्या वतीने सर्व निवडक खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले असून राष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *