LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

गोरेगावात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान! आजीवन प्रमाणपत्र वाटप सोहळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उपक्रम;
मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये स्नेहाच्या वातावरणात पार पडला वितरण सोहळा
गोरेगाव (गोंदिया):
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या गोरेगाव तालुक्याच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ‘आजीवन प्रमाणपत्र’ वाटप करण्याचा भव्य कार्यक्रम रविवारी (२६ जुलै) मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल. यु. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष आर. एस. रहांगडाले होते.
कार्यक्रमाचे रीतसर पूजन करून उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे उपाध्यक्ष टी. बी. भेंडारकर, कोषाध्यक्ष डी. एल. गुप्ता, कार्याध्यक्ष जी. ई. येळे, जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक आर. आर. अगडे, नगरसेविका शारदा सांगोडे, मार्गदर्शक ही. दा. येळे, प्राचार्य आर. डी. कटरे व पर्वते सर प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


७ सप्टेंबरच्या अधिवेशनाचे आवाहन
प्रास्ताविकातून तालुका सचिव एच. आर. चन्ने यांनी संघटनेच्या आजवरच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त संघटनेच्या सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांचे कौतुक केले. या वेळी आगामी ७ सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हा अधिवेशनाला गोरेगाव तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
यानंतर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अत्यंत आपुलकीच्या व खेळीमेळीच्या वातावरणात ‘आजीवन प्रमाणपत्र’ वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष पी. टी. पटले यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका कार्याध्यक्ष बी. बी. चौधरी यांनी मानले. अल्पोपाहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व सेवानिवृत्त सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *