LatestNewsUncategorizedगोंदियामहाराष्ट्र

Ganesh utsav: गणेशोत्सवाची चाहूल, उत्साहाचे वातावरण, मूर्तिकार जोमाने लागले कामाला

गोंदिया : शहरात गणपती बाप्पांच्या स्वागताची लगबग सुरू झाली असून, अवघ्या सहा ते सात दिवसांवर गणेशोत्सवाचे आगमन होत आहे. पारंपरिक आनंद, धार्मिक भावना आणि सामाजिक संदेशांचा संगम असलेल्या या उत्सवासाठी गोंदिया शहर आणि ग्रामीण भागातील विविध मंडळे, स्वयंसेवी संस्था, तसेच नागरिक जोमाने तयारी करत आहेत.शहरातील सर्वच कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांनी रात्रंदिवस काम सुरू केले आहे. विविध आकार, मापे आणि कलाकुसरीच्या मूर्ती घडविण्यात कारागीर व्यस्त असून, यंदा पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तीना विशेष मागणी आहे. मात्र, मातीचे भाव वाढल्याने मूर्तिकारांच्या खर्चात वाढ झाली आहे. शिवाय, शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तीवरील शासनाने बंदी उठविली असली तरी यावर्षी मातीच्याच मुर्तीला नागरिकांकडून विशेष मागणी होत आहे. मुर्तिकारांना दूरवरून माती आणून मुर्तिकाम करावे लागत आहे. गोंदिया शहरातील हा उत्साह आणि तयारी पाहता, येत्या गणेशोत्सवात भक्ती भावाबरोबरच सामाजिक भानही तेवढ्याच जोमाने प्रकट होणार, यात शंका नाही.

………………………………

पिओपी मुर्तीपेक्षा मातीच्या मुर्तीला मागणी

मातीच्या मुर्ती पारंपरिक, पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मान्यता मिळवत आहेत, मातीच्या मुर्तीना नागरिकांकडून अधिक मागणी होत आहे. विशेषतः जागरूक ग्राहक आणि पारंपरिक मूर्तिकारांच्या माध्यमातून. तरीही, त्यांच्या सुलभता, आणि आकर्षक स्वरुपामुळे बाजारात अद्याप टिकून आहेत. आता लोकांना बाप्पाच्या मुर्तीवर रंगबिरंगी कलर मारलेले कपड्यांऐवजी वास्तविक बाप्पाला वास्तविक पोषाख परिधान करण्याकडे नागरिकांचा कल आहे. एकुनच मातीची मुर्ती पर्यावरण पुरक असल्याने व त्याची विटंबना होत नसल्याने नागरिकांची यावर्षी मातीच्या मुर्तीला पसंती दर्शविल्याचे सांगत आहेत.

…………………

शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक उत्सवाची तयारी

गणेश विसर्जना वेळी नदी-तलावाचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थाही गणेशोत्सवाच्या आयोजनात सहभागी होऊन जनजागृती मोहिमा राबवणार आहेत. आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे, प्लास्टिक मुक्ती अभियान यांसारखे उपक्रम राबवून उत्सव अधिक सामाजिक दृष्ट्या उपयुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *