LatestNewsPoliticsक्रीडाविदर्भ

Ncp Gondia News;राकाँच्या बैठकीत बूथ कमिटी व सदस्यता नोंदणीचा आढावा

तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा संपन्न
गोंदिया :
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बूथ कमिटी व सदस्यता नोंदणीसंदर्भातील आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र जैन होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले व सौ.राजलक्ष्मी तुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत सदस्यता अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात ‘हर घर सभासद’ नोंदणी करून पक्षाचे संघटन बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी ‘पक्ष संघटन गावपातळीवर मजबूत करायचे असेल, तर सभासद नोंदणी आवश्यक आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता तालुक्यातील सर्व गावांमध्ये कार्यकर्त्यांनी सदस्यता अभियान अधिक प्रभावी व युवक, महिलाचा सहभाग वाढविणे यावर भर द्यावा, असे आवाहन केले. यानंतर गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र जैन व संचालक केतन तुरकर यांचा तालुक्याच्या वतीने स्मृतीचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सभेला राजेंद्र जैन, प्रेमकुमार राहंगडाले, राजलक्ष्मी तुरकर, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, देवेंद्रनाथ चौबे, केतन तुरकर, पूजा सेठ, बिरजुला भेलावे, कीर्ति पटले, माधुरी नासरे, रजनी गौतम, सरला चिखलोंडे , शर्मिला पाल, गोविंद तुरकर, रवि पटले, विजय राहंगडाले, प्रदीप रोकड़े, अखिलेश सेठ, अंचल गिरी, प्रकाश बरैया, चंदन गजभिये, युनुस शेख, सतीश कोल्हे, रिताराम लिल्हारे, श्याम लिल्हारे, शंकरलाल टेम्भरे, प्रकाश नेवारे, राजेश जमरे, एम शिवनकर, कुलेश भररे, गणेश फुंडे, सुरेश कावड़े, अशोक ब्राम्हणकर, चैनलाल दमाहे, भेजेंद्र तुरकर, इन्द्रराज शिवनकर, धर्मेंद्र गनवीर, उमेष मुनेश्वर, भागेश बिजेवार, राजेश्वर राहंगडाले, सचिन लिल्हारे सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *