गरिबांवर मोफत उपचार होणार, आजार कोणताही असो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही!
धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात भव्य महाआरोग्य शिबिर; हजारो रुग्णांनी घेतला लाभ
नागपूर (२७ जुलै) : आजार कितीही गंभीर असो, पैशांअभावी एकाही गरिबाचा उपचार थांबणार नाही. राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी अशा प्रकारची शिबारे खऱ्या अर्थाने वरदान ठरत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.’मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’ आणि ‘धर्मादाय रुग्णालय सहाय्यता कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिवप्रकाश, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार प्रवीण दटके, संजय भेंडे, मोहन मते, राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात हजारो रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले.१० आजारांच्या उपचारासाठी ९ लाखांपर्यंत, तर गंभीर आजारांसाठी ३५ लाखांपर्यंत मदतमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’त ज्या आजारांचा आधी समावेश नव्हता, त्या सर्व आजारांचा आता नव्याने समावेश करण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षांत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ५७ हजार रुग्णांना ४५२ कोटी रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.सर्व धर्मादाय रुग्णालयांकडून गरिबांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी डिजिटल यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. जवळपास १० आजारांच्या उपचारासाठी ९ लाख रुपयांपर्यंत, तर काही गंभीर आजारांसाठी ३५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. लहान मुलांसाठी ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रियाही मोफत सुरू करण्यात आली आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी दिव्यांगांना कृत्रिम हात आणि पाय वितरित केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरिबांची सेवा : नितीन गडकरी”या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांची खरी सेवा केली जात आहे.
कर्करोगाच्या (कॅन्सर) उपचारात वापरली जाणारी काही औषधे आणि इंजेक्शन अत्यंत महागडी आहेत. त्यांचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.”— नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

