LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून घरात डांबले; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार!

चंद्रपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

चंद्रपूर (२७ जुलै) : शाळेत गेलेल्या अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तत्परतेने शोध घेत आरोपीचे घर गाठल्यामुळे मुलीची सुखरूप सुटका झाली. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी लोकेश चव्हाण (रा. राजीवनगर, चंद्रपूर) याच्याविरोधात अपहरणासह मारहाण व डांबून ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नववीत शिकणारी १४ वर्षीय मुलगी २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सायकलने शाळेत गेली होती. सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. तिच्या मोठ्या बहिणीने शाळेत फोन करून विचारपूस केली असता ती आज शाळेत आलीच नसल्याचे समजले. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी परिसरात शोध सुरू केला. तिच्या वर्गमैत्रिणीकडे विचारपूस केली असता, ती आपल्यासोबत सोनचाफा मंदिरापर्यंत आली होती आणि तिथून तिचा मित्र लोकेश चव्हाण (रा. राजीवनगर) याच्यासोबत निघून गेल्याची माहिती मिळाली.बहिणीला मारहाण करून आरोपी पसारमाहिती मिळताच मुलीची आई, दोन मोठ्या बहिणी आणि भाऊ तात्काळ लोकेश चव्हाण याच्या घराकडे धावले. कुटुंबीय लोकेशच्या घरी पोहोचले असता घराच्या अंगणात मुलीची सायकल उभी दिसली. मात्र, मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावलेले होते. संशय आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला असता आतून अल्पवयीन मुलीचा आवाज आला. त्याच वेळी आरोपी लोकेश चव्हाण तेथे पोहोचला.”माझ्या मुलीला आत का बंद करून ठेवले आहे, कुलूप उघड,” असे विचारले असता आरोपीने हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दबावानंतर आरोपीने दरवाजा उघडला असता मुलगी घरात बसलेली आढळली. लोकेशने आपल्याला पळवून आणून घरात डांबून ठेवल्याचे मुलीने सांगितले.यावर मुलीच्या मोठ्या बहिणीने जाब विचारला असता, संतापलेल्या आरोपी लोकेश चव्हाण याने तिला हाताने व बुक्यांनी पाठीवर, मानेवर जबर मारहाण केली आणि “कोणाला काही सांगितले तर जिवे मारून टाकीन,” अशी धमकी देऊन पळ काढला.विविध कलमान्वये गुन्हा दाखलया घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने चंद्रपूर शहर पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली. त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपी लोकेश चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), १२७(२), १३७(२), ३५१ (३) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृणाल रामटेके करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *