LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात एलसीबीचा दणका; २४ तासांत ३ बेकायदेशीर बंदुकांसह चार जिवंत काडतुसे जप्त!

बल्लारपूर व मूल येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चंद्रपूर : जिल्हाभरात विनापरवाना व बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम उघडली आहे. मागील २४ तासांत एलसीबीच्या पथकाने बल्लारपूर आणि मूल शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय माहितीच्या आधारे छापे टाकून तीन बेकायदेशीर अग्निशस्त्रे (यात एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन भरमार बंदुका) आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून क्राईम जगतात एकच खळबळ उडाली आहे.पहिली कारवाई ४ जून रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या राजुरा उपविभागीय पथकाला एक इसम विनापरवाना शस्त्र बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बल्लारपूर येथे सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी सलमान खान मजिद खान पठाण (वय २८, रा. बल्लारशा) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती तात्काळ जप्त केली.घरात लपवून ठेवल्या होत्या गावठी बंदुका; मूल येथील कारवाईएलसीबीची कडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (एलसीबी), मूलचे पोलीस निरीक्षक विजय राठोड, पोउपनि संतोष निंभोरकर व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे. दुसरी कारवाई मूल शहरात करण्यात आली. एलसीबीचे अधिकारी व अंमलदार मूल शहरात पेट्रोलींग करत असताना, ताडाळा रोडवरील एका घरात विनापरवाना बंदुका लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ संजुसिंग संतोषासिंग पटवा (वय २४, रा. मूल) याच्या घरावर पंचांसमक्ष छापा टाकला. घराची कसून झडती घेतली असता, घरामध्ये अंदाजे २० हजार रुपये किमतीच्या दोन भरमार बंदुका (गावठी बनावटीचे अग्निशस्त्र) लपवून ठेवलेल्या मिळून आल्या. पोलिसांनी दोन्ही बंदुका जप्त करून आरोपीविरुद्ध मूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *