LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

मुख्य कार्यपालन अधिकारी एम. मुरुगानंथम यांची नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली

गोंदिया/नागपूर : गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एम. मुरुगानंथम यांची बदली झाली असून, त्यांची नियुक्ती आता नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी आज, १४ मे रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले. या आदेशानुसार, एम. मुरुगानंथम यांना आपल्या सध्याच्या पदाचा पदभार त्वरित सोपवून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एम. मुरुगानंथम यांनी गोंदिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना विविध प्रशासकीय कामांत आपला ठसा उमटवला होता. आता नागपूरसारख्या मोठ्या महानगराच्या महापालिकेत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *