LatestNewsगोंदिया

Retired employees protest : १५ सप्टेंबरपर्यंत सेवानिवृत्तांच्या समस्या मार्गी लावणार

शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश हर्षे यांचे आश्वासन
सेवानिवृत संघटनेच्या आंदोलनाची दखल
गोंदिया :
जिल्ह्यातील (retired employees) सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर, अधिकारी, कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांना घेवून वारंवार संघटनेच्या वतीने प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला जातो. परंतु, अधिकार्‍यांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने संघटनेकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. ३ सप्टेंबर रोजी जि.प.कार्यालयासमोर सेवानिवृत्तांनी धडक देत एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जि.प.उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांनी दखल घेत १५ सप्टेंबरपर्यत सर्व समस्या व प्रलंबित प्रश्न निकाली काढणार, असे आश्वासन दिले. यामुळे तुर्त सेवानिवृत्तांनी आंदोलन मागे घेतले.
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या (retired employees ) वतीने १५ दिवसापूर्वी सेवानिवृत शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात यावी, या संदर्भात जिल्हा परिषद सर्व अधिकारी, पदाधिकारी, आमदारांना निवेदन देण्यात आले. तसेच २ सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३ सप्टेंबर रोजी धरने आंदोलन करण्यात येणार, असा इशाराही देण्यात आला होता. परंतु, नेहमीप्रमाणे सेवानिवृत्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यातआले. २ सप्टेंबरला शिक्षण विभागाचे सौरभ अग्रवाल यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी उप मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या दालनात चर्चा करण्यास बोलाविल्याची सुचना दिली. त्यांच्या सूचनेनुसार संघटनेचे पदाधिकारी (retired employees ) उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांच्या दालनात पोहचले. तेव्हा ‘कुतिरकर यांनी मी आपणास बोलावले नाही’ असे सांगितले. तेव्हा शिक्षणाधिकारी यांना विचारणा करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी गेले असता ते देखील कार्यालयात हजर नव्हते. अधिकार्‍यांच्या या दुर्लक्षित भुमिकेमुळे नाईलाजास्तव सेवानिवृत संघटनेला आंदोलन करण्यास बाध्य केले. अखेर ३ सप्टेंबर रोजी जिल्हाभरातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी जि.प.कार्यालयावर धडकले. एक दिवसीय धरणे आांदोलन करून प्रशासनाच्या दिरंगाई भुमिकेचा निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनाची माहीती मिळताच सायंकाळी ७ वाजे पर्यंत बसून रात्री ९ वाजता शिक्षणाधिकारी यांच्या सहीचा संप मागे घेण्याचा पत्र आला. ज्या वेळेस संघटनेचे लोक चर्चा करण्यात आले होते तेव्हा चर्चा केली असती तर विचार केला असता. ३ सप्टेंबर ला सर्व सेवानिवृत कर्मचारी आंदोलन (retired employees ) स्थळी पोहचले तेव्हा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तथा जि प उपाध्यक्ष सुरेश भाऊ हर्षे यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना पाचारण केले. शिक्षक व आरोग्य कर्मचार्‍यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली. मी स्वतः याकडे लक्ष देत असून कर्मचार्‍यांच्या समस्या १५ सप्टेंबरपर्यंत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच उप मुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे आंदोलन तुर्त मागे घेण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे, राज्य प्रतिनिधी पी.आर.पारधी, कोषाध्यक्ष डी.एल.गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. संचालन उपाध्यक्ष पी.बी.लांजेवार तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष टी.बी.भेंडारकर यांनी केले. या आंदोलनात संघटनेचे सचिव पी.एन.बडोले, महिला प्रतिनिधी मनूताई उके, रेखा बोरकर, आरोग्य संघटनेचे सचिव विद्याताई अवधूत, ईमला भगत, विणा ठाकुर, प्रमिला लोणारे, फुलेश्वरी नांदणे, विजयलता पोहरकर, तालुका अध्यक्ष डी.एम.दखने, श्रीकृष्ण कोरे, जे.बी.बोपचे, डी.सी.तुळसीकर, जी.एफ.अंबुले, रमेश गहाणे, सुरेश शिवनकर, सुरेश आष्टीकर, डी.एन.गोलीवार, के.डी.चौधरी, वाय.बी.चौहान, टी.एन.बहेटवार, डी.बी.चौधरी, जी.एम.बैस, नरेंद्र कारंजेकर, बी.एस.सोनवाने, डी.व्ही.भेंडारकर, यू.एम.बागडे, बी.बी.चौधरी, एन.बी.राहांगडाले, माहुरे, एच.एन.परसुरामकर, सी.सी.सोनवाने, के.एस.होरे, एम.एल.चौरे, मेघनाथ वाघाडे व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व शेकडोच्या संख्येत सभासद बंधू भगिनी उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *