LatestNewsगोंदिया

कुटूबांतील ज्येष्ट हे घरातील आधारवड : शितल रमादे

सहयोग हॉस्पिटलच्या वतिने आरोग्य सप्ताहाचे आयोजन

गोंदिया : घरातील ज्येष्ठ नागरिक हे अगंनातील वटवृक्षा सारखे असून जसे वडाचे झाड सतत अगंनाथ सावली देण्यासाठी तत्पर असतात, तसे कुटूबांतील ज्येष्टनागरीक सुध्दा पुर्ण कुटूबांला आधार देत असतात. म्हणून अगंनात असलेल्या वटवृक्ष व कुटूबांतील ज्येष्ठ नागरीक यांची काळजीपुर्वक जपवणूक केल्यास निसर्गाप्रती व सामाजिक दायीत्वप्रती आपन योग्य समन्वयन साधू सकतो, असे भावनिक उदगार सहयोग ग्रपच्या संचालिका श्रीमती शितल रमादे यांनी व्यक्त केले. गोंदिया शहरातील ज्येष्ठ नागरीकासाठी सहयोग हॉस्पिटलच्या वतिने आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.

गोंदिया येथिल सहयोग हॉस्पिटल ग्रुपच्या वतिने ज्येष्टनागरीकांकरीता निशुल्क आरोग्य तपासनी सीबीसी, बीपी, आयबीएस, ईसीजी, बीएमआई, नेत्र , दंत, ईत्यादीची तपासनी व उपचार करण्यासाठी आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरीक सेवा सघांचे अध्यक्ष नारायनप्रसाद जमईवार, सचिव दुलिचंदराव बुद्धे, कार्याध्यक्ष अ‍ॅड.लखनसिंह कटरे, ज्येष्ठ नागरीक भरत क्षत्रिय, सिंधी समाज विकास समितीचे अध्यक्ष दर्यानुमल आसवानी, सहयोग ग्रुपचे आधारस्तंभ रमन रमादे उपस्थित होते.याप्रसंगी आयोजित शिबीराला बर्‍याच ज्येष्ठ नागरीक महीला /पुरूष उपस्थित होते. आयोजित शिबीरात सर्व ज्येष्ठ नागरीकांनी उपस्थितीत राहून आपल्या आरोग्याची तपासनी करून सुखमय जिवन जगावे, असे आव्हान ज्येष्ठ नागरीक सेवा संघातर्पेâ या प्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रोझीली गायकवाड़ यांनी केले. यशस्वीतेकरीता डॉ.सौरभ वरधानी, सचिन जोलदेव, कावीश परसोडकर, प्रशांत निमकर यांनी सत्कार्य केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *