Mobile Forensic van : गुन्ह्यांचा व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन ठरणार उपयुक्त : पोलीस अधीक्षक भामरे
अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते अनावरण
गोंदिया : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक / न्याय वैद्यकीय पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग म्हणून राज्य शासनाच्या धोरणानुसार महासंचालक (न्याय तांत्रिक) यांच्या वतीने सदर ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता गोंदिया जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गुन्ह्यांचा उलगडा करण्यामध्ये न्याय वैद्यकीय सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन ठरणार उपयुक्त , असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील गुन्हे तपास यंत्रणेला तांत्रिक बळकटी देण्यासाठी तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विविध गुन्ह्यांवर अंकुश घालण्यासाठी ७ ऑक्टोंबर रोजी पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे यांच्या हस्ते ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे’ (Mobile Forensic van ) अनावरण पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले. तसेच नजीकच्या काळामध्ये गोंदिया जिल्ह्यातील चारही उपविभागासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.(Mobile Forensic van ) या अत्याधुनिक व्हॅनमुळे एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन अप्लिकेशन यांचा समावेश आहे. यामध्ये डिजिटल फॉरेन्सिक, डीएनए सॅम्पलिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि क्राईम सीन मॅपिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. विशेष: सायबर गुन्हे, खून , अपघात आणि अन्य गंभीर गुन्यांच्या तपासात ही व्हॅन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या अनावरणप्रसंगी पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे यांनी सांगितले की, ‘फॉरेन्सिक विज्ञानाचा वापर करून तपास यंत्रणा अधिक मजबूत आणि पारदर्शक बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या (Mobile Forensic van ) माध्यमातून तपास कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. तसेच गुन्ह्यांचा उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.सदर अनावरण सोहळ्यात स्थागुशाचे पोनि. पुरुषोत्तम अहेरकर, पोनि. शेवते, राहुल दुरसेलवार, अंगुलीमुद्रा शाखा गोंदिया हे उपस्थित होते.
तपासात अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता‘
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ (Mobile Forensic van ) गोंदिया पोलिस दलात दाखल झाली आहे. या व्हॅनमुळे अत्याधुनिक व्हॅनमुळे गुन्हे तपासणी अधिक जलद, अचूक आणि प्रभावी होणार आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक फॉरेन्सिक उपकरणे बसविण्यात आली असून, गुन्ह्याच्या ठिकाणीच प्राथमिक पुरावे संकलित करणे, विश्लेषण करणे आणि त्वरित अहवाल तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेत वेळेची बचत होऊन वैज्ञानिक तपासात अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता येणार आहे.

