LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

अ‍ॅट्रॉसिटी झालेल्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीमुळे जगण्याची नवीन उमेद : पालकमंत्री नाईक

गोंदिया जिल्ह्यात ८ पात्र वारसदारांना
गट-ड संवर्गातील शिपाई पदाचे नियुक्तीपत्र आज वाटप
गोंदिया :
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ (सुधारित अधिनियम २०१५) अंतर्गत नियम १९९५ व सुधारित नियम २०१६ मधील अनुसूचित जाती जमातीच्या खून/मृत्यू प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या एका पात्र वारसाला शासकीय नोकरी देण्याचा शासनाचा निर्धार असून या अंतर्गत कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीमुळे जगण्याची नवीन उमेद निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रमात केले.
नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यावतीने नियोजन सभागृहात आज आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्री. नाईक बोलत होते. या कार्यक्रमास आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, समाज कल्याण समिती सभापती रजनीताई कुंभरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (नि.श्रे.) प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) मानसी पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किर्तीकुमार कटरे उपस्थित होते.

पालकमंत्री नाईक पुढे म्हणाले, अट्रॉसिटी अंतर्गत कुटुंबाला सहन करावी लागणारी हानी भरून न निघणारी आहे, मात्र शासनाने त्या कुटुंबाच्या जखमेवर फुंकर देण्याचे काम नक्कीच केले आहे आणि अशा कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाच्या विभागात गट-ड पदावर नियुक्ती दिलेली आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती, जमातीच्या ?ट्रॉसिटीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळणार आहे असेही ते यावेळी म्हणाले. यानिमित्ताने शासनात येणारे कर्मचारी हे कुटुंबाचा आर्थिक भार उचलतील, सोबतच देश सेवाही करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यात ८ पात्र वारसदारांना गट-ड संवर्गातील ‘शिपाई’ पदाचे नियुक्तीपत्र हर्ष छेदीलाल इमलाह, संगीता भीमराज कुंभरे, देलेंद्र टोलूराम बेलबंशी, दिनेश श्रीराम दरवडे, आर्यन कृष्णकुमार मेश्राम, रजनी मनोहर घमगाये, निकिता अर्पित उके, दिशा निशांत मेश्राम या आठ लोकांना आज पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *