LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

सालेकसा पोलिसांचा राज्य स्तरावर गौरव; ‘गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न’ पुरस्काराने सन्मानित

गोंदिया (Gondia) : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने दिला जाणारा फेब्रुवारी २०२६ चा “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न” हा बहुमान गोंदिया जिल्ह्यातील Salekasa Police सालेकसा पोलीस स्टेशनच्या पथकाने पटकावला आहे. गुन्ह्यांच्या तपासात दाखवलेली तत्परता आणि पुराव्यांचे अचूक संकलन केल्याबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते या पथकाचा १० एप्रिल रोजी गौरव करण्यात आला.
या पुरस्काराचे मानकरी Salekasa Police सालेकसा पोलीस स्टेशनचे अधिकारी भूषण बुराडे, सपोनि किशोर मावस्कर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर व पैरवी अधिकारी ठरले आहेत. पोलीस महासंचालकांच्या हस्ते या सर्व अधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
फेब्रुवारी महिन्यात या पथकाने केलेल्या उत्कृष्ट तपासाची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली. तपासाची गुणवत्ता आणि कायदेशीर तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात या पथकाने मोलाची भूमिका बजावली होती. सालेकसा पोलिसांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल Salekasa Police गोंदियाचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांनी पथकाचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलाची मान उंचावली असून, सर्वत्र या पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *