LatestNewsगोंदियागोंदिया- भंडाराविदर्भ

खोडशिवनी- रेल्वेटोली ते खैरी रस्त्याची दुरावस्था

खड्डेमय रस्त्यातून काढावी लागते वाट
सडक अर्जुनी :
तालुक्यातील सिंदीबिर्री गट ग्रामपंचायत अंतर्गत खोडशिवनी रेल्वेटोली ते खैरी रस्त्याची दुरुस्ती २० ते २५ वर्षांपासून झाली नसल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने मार्गक्रमण करतांना खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे.
खोडशिवनी रेल्वे टोली ते खैरी या दोन किमी.अंतरावर असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असून जीव धोक्यात घालून ये-जा करीत आहेत. सडक अर्जुनी हे तालुका ठिकाण असल्याने येथे बाजारपेठ, शिक्षण संस्था, शासकीय कार्यालये आहेत. त्याकारणाने या रस्त्याने खोडशिवनी ते सौंदड जाणारा रस्ता असल्याने ग्रामीण भागातून सदर मार्ग जवळचा असल्याने या मार्गावर नेहमीच जास्त वर्दळ असते. घाटबोरी, तेली घाटबोरी, सिंदीपार, बौध्दनगर येथील नागरिक रेल्वेने जाण्यासाठी खोडशिवनी रेल्वे टोलीवर यावे लागते. तसेच सडक अर्जुनी जाण्यासाठी हा मार्ग जवळपास ५-६ किमी. अंतर जवळ पडतो. पण मागिल २० ते २५ वर्षांपासून या दोन किमी. रस्त्यावर ८ ते १० फुट लांब रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर अनेक अपघात घडले असून अनेकांना अपंगत्व आले आहे.मात्र या दोन किमी. रस्त्याच्या दुरावस्थेकडे या भागातील लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले असून हा रस्ता खड्डेमय झाला आहे. खोडशिवनी रेल्वे टोली ते खैरी रस्ता सौंदड जि.प.क्षेत्रात येत असून या जि.प.क्षेत्राचे लोकप्रतिनिधी यांनी या गावाकडे दुर्लक्ष केले असून फक्त निवडणुकी पुरतेच मतदारांना खोटे आश्वासन देऊन मुर्ख बनविले आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी येणारा विकास निधी? शेवटी जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
…………………….
रस्ता बांधकामाच्या नावावर मालसुतो कार्यक्रम
जि.प.क्षेत्रामध्ये अनेक गावांमध्ये चांगल्या सुस्थितीत असलेल्या रस्त्यांना फोडून त्याठिकाणी नविन रस्ता तयार केला जात आहे. तर ज्या ठिकाणचे रस्ते पूर्णत: जर्जर होवून दुरूस्तीची प्रतिक्षा करीत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा काम नित्याचाच झाला आहे. या प्रकारामुळे विकासापासून जनप्रतिनिधींना काही देणेघेणे नाही, ज्या कामातून मलई लाटता येईल, त्या ठिकाणी कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे. रस्ता बांधकामाच्या नावावर कंत्राटदार व जनप्रतिनिधी खिसे गरम करीत असल्याची चर्चा परिसरात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *