स्वार्थी राजकारणाने रिसामा क्षेत्राचा विकास खुंटला
रस्ते, नाले, इतर समस्या जैसे थे : भौतिक सुविधा व योजनाच्या लाभापासून नागरिक वंचित
आमगाव : आमगाव शहराला लागून असलेल्या रिसामा या गांव परीक्षेत्राचा विकास खुंटला आहे. स्वार्थी राजकारण आणि सुरू असलेल्या कुरघोड्या विकासाला बाधक ठरत आहेत. राजकारणात दुसऱ्यांना पाडापडी धोरणपुढे समूळ विकास थांबविण्यात आले आहे. यामुळे क्षेत्रातील समस्या मार्गी लागणे शक्य तो कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे रस्ते नाल्यात अक्खे नगर पडले असल्याचे चित्र समोर आहे.परंतु राजकारणी स्वतःचे स्वार्थ सोडत नसल्याने विकासाला गती मिळाली नाही. या सर्वात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. त्यामुळे या संधीसाधू राजकारण्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे.
आमगाव – देवरी विधानसभा मतदारसंघात संघातील आमगाव तालुका मातब्बर राजकारण्याचे माहेरघर आहे. त्या दृष्टीने या तालुक्याच्या विकास झालेला नाही. एकही राजकारणी विकासाला घेऊन लढा देताना दिसून आले नाही. यामुळेच आमगाव तालुका विकासाच्या दृष्टीने मागासलेला आहे. याला राजकारणातील द्वेष, वर्चस्वची लढाई यात मात्र मूलभूत विकास साधण्यात यश आले नाही. रिसामा गांव परीक्षेत्रातील अनेक प्रभागात नाल्याचे डोह, गलिच्छ नाल्या, खड्यात पडलेली रस्ते यामुळे नगरे घाणीने माखले आहेत. अनेक नगरात पावसाचे पाणी साचल्याने डोह निर्माण झाले आहेत.नागरिकांना पाणी पुरवठा योजना साठी आत्मनिर्भर नसल्याने आजही बनगांव प्रादेशिक योजनेवर अवलंबुन असल्याने पाण्याची प्रतीक्षा कायम आहेत. यामुळे योजना व विकास मिळत नसल्याने नागरिक येथील गलिच्छ राजकारणापुढे हतबल ठरले आहेत.
रिसामा गांव नगर परिषद परीक्षेत्रात समाविष्ठ होते. भविष्यातील विकास गतिशील होईल अशी आशा होती मात्र राजकारण होत असल्याने विकासाची आशा संपल्यात आहे. गावातील अनेक विकास कामे मागील दहा वर्षापासून थांबल्याने नागरिकांत तीव्र असंतोष आहे. खऱ्या अर्थाने या गावातील परीक्षेत्रातील विकास कामाना गती नसल्याचे मुख्य बाब ही स्वार्थी राजकारणापुढे अपंग पडले आहेत.रिसामा परीक्षेत्रातील अनेक सिव्हिल लाईन, बँक कॉलोनी, रेणुका नगर, संभाजी नगर,गणेश नगर, संकल्प नगर,प्रगती नगर, सहकार नगर, असाटी नगर, शाहू नगर, कबीर नगर हे नगर पंचायत अथवा नगर परिषद या भागात विकासाच्या बाजूने जाण्याची भूमिका कायम ठेवली आहे. मात्र रिसामा येथील मूळ गावातील राजकीय नेत्यांनी स्वार्थापुढे जाऊन गतिशील विकासाचा बळी घेतल्याचे चित्र पुढे आहे. त्यामुळे गांव परीक्षेत्रातील विकासाला गती मिळाली नाही. गावातील नाले, रस्ते पूर्णतः खड्यात पडले आहेत. सध्या पावसाळ्यात गावातील रस्ते खड्यात पडून पाण्याचे डोहात रूपांतर झाले आहे. यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून मृत्यूला ओलांडून मार्गक्रम करीत आहे. मात्र स्थानिक प्रशासन तर स्थानिक राजकारणी निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहेत. गांव परीक्षेत्र विकासापासून थांबल्याने नागरिकांत मात्र तीव्र असंतोष निर्माण झाले आहे.
………………………………..
नगर परिषद व नगर पंचायत वाद
आमगाव तालुक्यातील रिसामा हे गांव नगर परिषद परीक्षेत्रात समाविष्ठ करण्यात आले होते. परंतु नगर परिषदेत समाविष्ठ व्हायचे नाही म्हणून काही राजकारण्यांनी यात वेगळी भूमिका घेत नगर परिषदला प्रखर विरोध दर्शविला यात गावातील राजकारणी पुढऱ्यांनी स्वार्थी नेत्यांच्या नेतृत्वात सरळ वेगळी भूमिका घेत न्यायालय पर्यंत लढाई समोर करीत भूमिका प्रखर ठेवली. यात सलग १० वर्ष लोटली. यात मात्र अद्यापही निकाल हा लागला नाही. त्यामुळे जनतेला मिळणारे योजना व विकास या परीक्षेत्रात दिसून आले नाही. या वादत संपूर्ण क्षेत्रात विकास कामाचा बोजवारा उडाला आहे. जनता विकासाची वाट पाहत कंटाळली आहे. विशेष म्हणजे या वादाला आपल्या स्वार्थापोटी खतपाणी देण्याचे काम राजकारण्यांनी दिले.

