“सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व टिकवून ठेवा”- आ. संजय पुराम
साखरीटोला येथे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा थाटात संपन्न;
समाज भवनासाठी ६० लाखांच्या निधीची घोषणा!
८ जोडपी झाली विवाहबद्ध
साखरीटोला:- युवा कुणबी समाज सेवा समितीचा २३ वर्षांचा यशस्वी वारसा असून यांच्या वतीने मागील २३ वर्षांपासून सुरू असलेली सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. “सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पैसा आणि वेळ या दोन्हीचा अपव्यय टाळता येतो, त्यामुळे ही परंपरा आणि तिचे महत्त्व टिकून राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन आ. संजय पुराम यांनी केले. यावेळी त्यांनी समाज भवनासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली.
१२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या सोहळ्यात ८ जोडपी विवाहबद्ध झाली. सन २००३ पासून समितीद्वारे हा उपक्रम राबविला जात असून, यंदाही हजारो समाजबांधव व दिग्गजांच्या उपस्थितीत नियोजित वेळी सकाळी 11.05 वा. साखरीटोला येथे सामूहिक विवाह सोहळा पडला. हिंदू धर्मपद्धतीने विवाह लावून देण्यात आले.
या सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. आ. डॉ. परिणय फुके यांनी नववधूंना शुभेच्छा देत समाज भवनासाठी २० लक्ष रुपये जाहीर केले. तसेच खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता सामूहिक विवाहाचे महत्त्व अधोरेखित केले आणि समाज भवनासाठी १५ लक्ष रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी माजी खा. सुनील मेंढे, माजी आ. सहसराम कोरोटे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर डाँ. नोव्हिल ब्राम्हणकर यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून वधु-वरांना शुभाशीर्वाद दिले.

या मंगलप्रसंगी माजी आ.भेरसिंग नागपुरे, नप सदस्य प्रफुल अग्रवाल, सालेकसाचे नप अध्यक्ष विजय फुंडे, उपाध्यक्ष कुंदन बहेकार, माजी जि.प. सभापती सविता पुराम, जिप सदस्य उषा मेंढे, वंदना काळे, लक्ष्मी तरोने, माजी सभापती लता दोनोंडे, पस सदस्य रेखा फुंडे, इंजी. सुनील तरोने, लीलाधर पाथोडे, संपत सोनी, काशीराम हुकरे, बाबा कटरे, समितीचे संस्थापक पदाधिकारी प्रभाकर दोनोंडे, भूमेश्वर मेंढे, कमलबापू बहेकार, रमेश चुटे, युगराम कोरे, यांच्या उपस्थित विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संतोष बोहरे, पुर्थ्वीराज शिवणकर, देवराम चुटे, अरविंद फुंडे, रामदास हत्तीमारे, प्रमोद कोरे, नरेश कावरे, चंद्रकुमार बहेकार, योगेश बहेकार, प्रेम कोरे, जी.डी. भांडारकर, देवराज खोटेले, शामलाल दोनोंडे, अनिल काळे, प्रेमलाल ठाकरे, मोहन दोनोंडे, नितीन शिवणकर, इंदूताई कोरे, टीनाताई चुटे, किरणताई कोरे, सविता येटरे, स्वाती फुंडे, प्रतिभा मेंढे, मंजुषा दोनोंडे, माया चुटे, वंदना चुटे, चेतनबाई कोरे, प्रणिता बहेकार,अनिता बोहरे, सरिता बोहरे, दीपिका कोरे, राधाबाई बहेकार, प्रमिला दोनोंडे, नूतन फुंडे, वैशाली मेंढे, अरुणा मेंढे, यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व महिला मंडळाने परिश्रम घेतले. भोजन, पाणी आणि बैठक व्यवस्थेचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर दोनोंडे यांनी केले संचालन देवराम चुटे यांनी तर उपस्थिताचे आभार कमल बहेकार यांनी मानले.

