LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

(Forest Department Action) : गोठणगाव वनपरिक्षेत्रात वनविभागाचा तस्करांना दणका

अवैध सागवान जप्त करून आरोपींवर न्यायालयीन कारवाई
अर्जुनी मोरगाव (Gondia) :
तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तिरखुरी भाग १ मध्ये (Forest Department Action) वनविभागाने धाडसी कारवाई करत अवैध सागवान लाकडाची वाहतूक पकडली आहे. याप्रकरणी वनविभागाने आरोपींविरुद्ध अर्जुनी मोरगाव येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली असून, या कारवाईमुळे वनतस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, (Forest Department Action) गोठणगाव वनपरिक्षेत्रात वनसंपदेची चोरी व अवैध वाहतूक रोखण्यासाठी वनविभागाकडून गस्त तीव्र करण्यात आली आहे. दरम्यान, तिरखुरी भाग १ अंतर्गत सहवनक्षेत्र पथक रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. (Forest Department Action) पथकाने तातडीने तपासणी केली असता, सागवान प्रजातीचे मौल्यवान चिरान अवैधरित्या वाहून नेले जात असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता सदर वनउपज जप्त केला आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
ही यशस्वी कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार आणि तिरखुरी भाग १ चे क्षेत्र सहाय्यक रविंद्र हेडाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. (Forest Department Action) याप्रकरणी आरोपींविरुद्ध मा. न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) न्यायालय अर्जुनी/मोरगाव येथे वनगुन्ह्यांतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. वनसंपदेचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कठोर पावले उचलली जातील आणि रात्रगस्त अधिक प्रभावी केली जाईल, असा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे. या कारवाईचे परिसरात कौतुक होत असून अवैध लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *