Dr.Pankaj bhoyar भंडारा जिल्हयातील विद्यार्थी देणार रमण सायन्स सेंटर व इस्त्रोला भेट
-पालकमंत्री डॉ. पंकज भोयर (dr pankaj bhoyar) यांची संकल्पना
गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळयात केले सुतोवाच
भंडारा (Bhandara) : जिल्हयातील विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणारे व त्यातून जिल्हा तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट काम करणा-या विदयार्थ्याना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांना रमण सायन्स सेंटर, इस्त्रो व नासासारख्या संस्थाची शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात येईल, असे सुतोवाच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग डॉ. पंकज भोयर (Dr.Pankaj bhoyar) यांनी केले.
जिल्हा परिषद भंडारा व शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार समारंभ तसेच फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अखिल सभागृह गणेशपूर, भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार सुनिल मेंढे, जि.प चे पदाधिकारी नरेश इश्वरकर, शितल राऊत, आनंद मलेवार, अनिता नलगोपुलवार, रसिका रंगारी, गटनेता विनोद बांते, संदीप ताले, यशवंत सोनकुसरे, दिलीप सार्वे, गजानन निरगुडे, श्रीमती कल्पना कुर्जेकर, नागेश भगत, सुषमा पारधी, लता नरुले, यांच्यासह जिल्हाधिकारी सावनकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, प्राचार्य, डाएट भंडारा राजेश रुद्राकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या तालुकास्तर व जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्वाकांक्षी व प्रेरणादायी उपक्रम असून त्यातून भावी वैज्ञानिकांची पायाभरणी भंडारा जिल्ह्यातून होईल. असा आत्मविश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.ज्ञशिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रात सर्वांच्या सहयोगाने चांगले काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न जलद गतीने सोडविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नुकताच राज्य शासनाकडून 114 कोटीचा निधी भंडारा जिल्हयाला प्राप्त् असून तो लवकरच धान उत्पादकांना वर्ग करण्यात येईल, अशी ग्वाही (Dr.Pankaj bhoyar) त्यांनी यावेळी दिली.

या क्षेत्रभेटीमध्ये सात तालुका स्तरावरून प्रथम 21 विदयार्थ्यांची निवड करून त्यांना सी.व्ही.रमण सेंटर ,नागपूर येथे तर जिल्हा प्रदर्शनात उत्कृष्ट 51 विदयार्थ्याना इस्त्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगलोर येथे तसेच राज्य स्तरावरील 51 उत्कृष्ट विद्यार्थ्याना नासा संस्था,अमेरीका येथे क्षेत्रभेटीला नेण्यात येईल. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बेंगळूरु येथे विद्यार्थ्यांना विमानाने नेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संधी, संशोधनाची दिशा आणि वैज्ञानिकांचे प्रत्यक्ष अनुभव समजून घेण्यास सक्षम होणार आहेत. या उपक्रमासाठीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा आहे. या उपक्रमाचा संशोधक वृत्ती, आत्मविश्वास, जिज्ञासावृती आणि तंत्रज्ञानाकडे आकर्षण निर्माण करणे हा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना थेट संशोधन संस्थांच्या कार्यपद्धतीची ओळख होणार असून भविष्यातील वैज्ञानिक आणि संशोधन घडविण्याच्या दृष्टीने ही क्षेत्रभेट असून, भविष्यातील वैज्ञानिक आणि एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे. सदर क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांची निवड ही तालुका व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभागी घेणार आहे. झालेल्या विद्यार्थ्यांमधून गुणानुक्रमे करण्यात येणार आहे.
आजच्या जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळयात अनमोल केवळराम रंगारी, प.शि. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भिलेवाडा. पं.स.भंडारा, रामकृष्ण मदन चाचेरे, स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झाडगाव, प.स.साकोली, गौरीशंकर यशवंत वासनिक, प.स.शि. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हसारा. प.स.तुमसर, नरेंद्र नत्थूराम चौधरी.प.शि. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कांद्री/बे.प.स.मोहाडी, नंदलाल तुळशिराम बिलवणे, स.शि.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावङ प.स.पवनी, श्री. डॉ. चोपराम लक्ष्मण गडपायले, स.शि.लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा. ज्ञानेश्वर हेमराज मेंढे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद हाय.व.कनिष्ठ महाविद्यालय सानगडी पं..स. साकोली, गोपाल मंगू राठोड, स.शि.जिल्हा परिषद हायस्कूल नाकाडोंगरी, पंचायत समिती तुमसर. सौ.आभा चंद्रकुमार नंदनवार, प.शि.जकातदार विद्यालय भंडारा या शिक्षकांचा सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हयातील शिक्षण विभागाचा धावता आढावा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र सोनटक्के यांनी घेतला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मंगला गोतारणे यांनी तर आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद ठवकर व महेश जगनिक यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी विनायक वंजारी, हरिकिशन अंबादे, रवींद्र माडेमवार, लता धकाते, देवेंद्र शेंडे, मनीष वाहाने, देवानंद घरत आदींनी परिश्रम घेतले.

