LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

Akshaya Tritiya Child Marriage : अक्षय तृतीयेला होणार्‍या बालविवाहावर करडी नजर

बालकल्याण समितीसह पोलीस विभाग सतर्क
गोंदिया (Gondia) :
(Akshaya Tritiya Child Marriage) समाजामध्ये मोठया प्रमाणावर असलेल्या अशिक्षितपणा, गरिबी, लहान वयात लग्न करण्याची रुढी परंपरा, जाती व्यवस्था यामुळे बाल विवाहचे प्रमाण वाढत आहेत. भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक क्रिया आहे. अक्षयतृतीया या शुभ मुहूर्तावर सामुदायीक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बालविवाहावर आळा घालण्यासाठी यंत्रणा सतर्क झाली असून करडीनजर ठेवणार आहे.
यावर्षी (Akshaya Tritiya Child Marriage) अक्षयतृतीया १९ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. महिला व बाल विकास विभागाच्या सुचना तसेच वालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार बालविवाह रोखणे आणि बाल हक्काच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे. अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर किंवा इतर वेळी होत असलेले विवाह संदर्भात बाल विवाह होणार नाही. यासाठी प्रत्येक सुजान नागरिकांनी याची खबरदारी घेतली पाहिजे. १८ वर्षाच्या आत मुलीचे लग्न व २१ वर्षाच्या आत मुलाचे लग्न लावणे कायदयाने गुन्हा आहे. (Akshaya Tritiya Child Marriage) बालविवाह करणे कायदयाने गुन्हा असून बालकांशी विवाह करणार्‍याला व करुन देणार्‍याला बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अन्वये दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व १ लाख रुपये दंड किंया दोन्ही होऊ शकते. त्या अनुसंगाने बालकल्याण समितीसह पोलीस यंत्रणा सतर्क मोडवर आली असून अक्षय तृतीयाला होणार्‍या बालविवाहावर करडी नजर ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी संबधितांना जबाबदारी देण्यात आली असून बालविवाह प्रकल्प अधिकारी (नागरी) आणि प्रकल्पांतर्गत नेमलेल्या आंगणवाडी पर्यवेक्षिका व ग्रामपंचायत स्तरावर संबंधित ग्रामसेवक, सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आंगणवाडी सेविका यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.

बाल विवाह करणे हे कायद्याने गुन्हा असून चालत असलेल्या रुढी पंरपरेनुसार बालविवाह करु नये, असे केल्यास बालविवाह प्रतिबंध अधिनियमान्वये शिक्षेस पात्र असेल.

  • तुषार पौनिकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

………………
बालविवाहबाबत सुचना द्या
बालविवाह आपल्या गावात होत असल्यास तसेच बालविवाहबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल प्रâी क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी. बालकांच्या क्षेत्रात काम करणार्‍या विविध यंत्रणा तसेच सुजान नागरिक यांनी अक्षयतृतीया या दिवशी बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *