LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून नवेगाव बांध नवोदय विद्यालयाची पाहणी

वसतिगृहांना वॉटर कुलरसह अद्ययावत सुविधांचे आश्वासन
नवेगाव बांध: भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे यांनी आज नवेगाव बांध येथील ‘पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालया’ला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी तातडीने आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि पिण्याच्या पाण्याची निकड लक्षात घेऊन, खासदारांनी गर्ल्स आणि बॉईज अशा दोन्ही हॉस्टेलसाठी तातडीने वॉटर कुलर देण्याची घोषणा केली असून यामुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या भेटीदरम्यान खासदारांनी विद्यालयातील प्रत्येक वर्गखोलीत जाऊन शैक्षणिक स्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मेसमध्ये बसून भोजनाचा आस्वाद घेतला व जेवणाच्या दर्जाची प्रत्यक्ष खात्री केली. मुलींच्या वसतिगृहाची पाहणी करताना त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचे सांगितले. विद्यालयाचा शैक्षणिक व शारीरिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी ८०० मीटरचा धावपट्टीचा ट्रॅक आणि सर्व खेळांच्या आधुनिक सोयीसुविधांसह अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅबची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले. संपूर्ण कॅम्पसचा कायापालट करून सोयीसुविधांनी युक्त परिसर निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य जुमडे सर, गंगाधर परशुरामकर, राजेश मुनेश्वर, भामा चुरे, रामदास बोरकर व इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *