LatestNewsगोंदियागोंदिया- भंडाराविदर्भ

भाजीपाला लागवडीतून आर्थिक प्रगती रंजना झोडे यांची यशोगाथा

भंडारा : जिल्ह्यातील साकोली तालुक्यापासून अकरा किलोमीटर अंतरावरील शिवणीबांध गावामध्ये राहत असलेल्या सौ.रंजना रमेश झोडे त्यांचेकडे आज अठरा एकर शेतजमीन आहे. धान (भात)पीकपद्धती म्हणजे भंडारा जिल्ह्याची ओळख. त्यामुळे आम्ही देखील धान लागवड करतो. परंतु पारंपारिक धान लागवडीतून अपेक्षित उत्पन मिळत नव्हते. त्यामुळे पर्यायी पिकांचा शोध सुरु केला, साकोली येथील कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्याशी चर्चा झाली त्यातून भाजीपाला लागवड फायदेशीर होईल असे लक्षात आले. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे. सुरवातीला एका एकरावर वांगी लागवड केली.

साकोली बाजारपेठेत वांग्यांची विक्री केली. त्यातूनच चांगले उत्पन्न मिळाल्याने भाजीपाला लागवड क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचे भाजीपाला लागवड क्षेत्र सात एकरावर पोहचले आहे. यंदा एक एकरावर कारली लागवड केली होती. सुधारित पद्धतीने लागवडीचे नियोजन केले. पाच फुट बाय दोन फुट अंतरावर लागवड केली. पाणी बचतीसाठी आच्छादनाचा वापर केला. लागवड करतांना शेणखत आणि कोंबडीखत जमिनीत मिसळून दिले. त्याबरोबरीने १०:२६:२६ हे खत दिले होते. त्यानंतर पीक वाढीच्या टप्प्यानुसार शिफारशीत विद्राव्य खतांची मात्र ठिबकद्वारे दिली. कारल्याचे एकरी आठ टन उत्पादन मिळाले. विक्री नागपूर बाजारपेठेत केली. प्रतिकिलो रु. १५ ते ३० असा दर मिळाला. पीक व्यवस्थापन खर्च वजा जाता कारले पिकातून १,५०,००००/- रुपये नफा मिळाला. दर वर्षी ऑगस्ट महिन्यात काकडीची वीस गुंठ्यांवर लागवड असते. सुधारित पद्धतीने लागवडीचे नियोजन केले जाते. वीस गुंठ्यातून सहा टन उत्पादन मिळाले.नागपूर बाजारात १५ रुपये किलो या घाऊक दरात काकडीची विक्री केली. याच बरोबरीत खरिपात ३० गुंठ्यांवर ढेमसे या पिकाची लागवड असते. या पिकाच्या व्यवस्थापनाचा खर्च रु. १२,०००/- होतो. याची विक्री नागपूर बाजारपेठेत केली जाते. कारली, काकडी या पिकातून चांगले आर्थिक उत्पादन मिळते. सध्या पाच एकरांवर मका व भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. शेती मध्ये करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत अ‍ॅग्रोवन कृषि वृत्तपत्रात यशोगाथा प्रकाशित झाली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *