LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

accidents भीषण अपघात : भरधाव ट्रेलरने दुचाकीला उडवले

तरुण गंभीर : टी-पॉईंट चौकातील घटना
नवेगावबांध :
येथील टी-पॉईंट चौकात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका भरधाव १८ चाकी ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक दिली. accidents या भीषण अपघातात योगेश काशीनाथ ब्राम्हणकर (१६) रा.सोनका पळसगाव, ता.साकोली, जि. भंडारा हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश हा आपल्या दुचाकी क्र.एमएच-२६/एसी-४६६४ ने पेट्रोल पंपाकडून टी-पॉईंट चौकाकडे जात होता. त्याच वेळी अर्जुनी मोरगावकडून कोहमाराच्या दिशेने जाणार्‍या टाटा कंपनीच्या १८ चाकी ट्रेलर क्र.सीजी-२२ एजे ५५२२ त्याला धडक दिली. ट्रेलर चालक लक्की कृष्णकुमार महोबिया (वय २०) रा.लांजी, जि.बालाघाट, मध्यप्रदेश हा वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत असताना हा अपघात घडला.
अपघातानंतर जखमी योगेशला तातडीने नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. accidents मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक तपासणीनंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविले आहे. या घटनेबाबत लखन घनश्याम कोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा क्रमांक ७१/२०२६, भारतीय न्याय संहितेचे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश मेश्राम पुढील तपास करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *