LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

BusAccident : लग्नाची वरात घेऊन परतणाऱ्या खाजगी बसला अपघात; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

गोंदियाः लग्नाची वरात घेऊन परत घेत असलेल्‌या क्रजगी बसचा भीषण अपघात गुरुवारी (१२ मार्च) पहाटे गोंदिया जिल्हातील कारंजा परित्तरात घडला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून सहा वराती गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी गाढ़ झोपेत असल्‌याने अचानक झालेल्या धडकेमुळे बसमध्ये एकच गोंधळ उভালো. 
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्‌ह्यातील गोरेगाव तालुक्यातील चोपा-मोहाठी येधील वरखडे कुटुंबीयांच्या राम्रासाठी वरात मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्‌ह्यातील खैरलांजी महकेपार येथे बुध्तार (११ मार्च) रोजी दुपारी गेली होती. रात्री उशिरापर्यंत लग्रसोहळा पार पडल्यानंतर वरात पहाटेम्या सुमारास खाजगी बसने परत निघाली होती.BusAccident बसमध्ये महिला, पुरुष तरीच लहान मुलांराह अनेक वराती प्रवास करत होते.
दरम्यान, कारंजा परिसरात बस चालकाने समोर असलेल्‌या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयन केला. मात्र, बस भरधाव वेगात असल्‌याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ताबा सुटलेल्या बसने समोरील वाहनाला धडक दिल्‌यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्‌या झাতী-झुडपांमध्ये घुसत काही अंतरापर्यंत धाव घेतली. वेग जास्त असल्यामुळे बसने ररूयालगतच्या अनेक अष्ठांना धठक वेत त्यांना मोडीत काढले. या अपघातात बराचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात चुराडा झाला असून समोरील काम पूर्णपणे फुटली.या अपघातात सोनू घनश्याम उईके (२७, रा. वाडी, नागपूर पांचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मी घनश्याम उईके (५८, रा वाडी, नागपूर), नैतिक श्याम सीडाम (१४, रा. कोहमारा), हेमराज श्रवण चव्हाण (५३. रा. कवळीटोला, गोरेगाव) आणि शोभा उदेलात पंधरे (७०, रा. कीहमारा, ता. सहक अर्जुनी) यांसह अन्य जखमींना उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात वाचाल करण्यात आले आहे. BusAccident अपघातानंतर बस चालकाने वाहनातून उडी मारून घटनारधकावरून पळ काढल्‌याची माहिती समोर आली आहे. BusAccidentअपघात होताच बसमधील काही प्रवाशांनी घाठस दाखवत खिडक्यांमधून बाहेर पडून इतरांना बाहेर काढण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच कारंजा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले व गोंदिया येथील केटीएस जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यास मदत केली. जखमींवर सध्या उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्‌याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघातग्रस्त बस रख्याच्या कडेला झाडीत अडकलेल्‌या अवस्थेत आढळून आली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *