congress adolan : गॅस दरवाढ आणि शेतकरी प्रश्नांवर तिरोड्यात एल्गार
महामहिम राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन
तिरोडा (गोंदिया) : केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत केलेली भरमसाठ वाढ आणि महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांची होत असलेली फसवणूक याविरोधात तिरोडा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार एन. एम. ठाकरे यांच्यामार्फत भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, congress adolan केंद्र सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे या किमती त्वरित कमी करण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, महाराष्ट्र शासनाने कृषी पंपांच्या वीज पुरवठ्यावर लोडशेडिंग लावून शेतकर्यांची कोंडी केली आहे. शेतकर्यांना शेतीसाठी किमान १८ तास अखंडित वीज पुरवठा करावा, नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना मिळणारी प्रोत्साहन राशी १.५० लाख रुपये करावी आणि ज्या शेतकर्यांचे धान अद्याप खरेदी केलेले नाही, त्यांच्यासाठी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून त्वरित धान खरेदी सुरू करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यासोबतच, ग्रामीण भागात मनरेगाची कामे सुरू न झाल्याने मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला असून ही कामे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. congress adolan तसेच एस.टी. महामंडळाने ओळखपत्रासाठी प्रवाशांकडून पैसे घेणे बंद करावे, असा मुद्दाही निवेदनात उपस्थित केला आहे.
याप्रसंगी तहसीलदार एन.एम.ठाकरे यांच्यासह गटविकास अधिकारी, महावितरणचे अभियंता, तिरोडा डेपो मॅनेजर, डीएमओ गोंदिया कार्यालयाचे अधिकारी आणि संकेश गॅस एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्वात congress adolan काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी केले. या आंदोलनात राधेलाल पटले, रमेश टेंभरे, परमानंद पारधी, शिवप्रसाद यादव, रामचंद्र भगत, अनिल टेंभरे, गजानन रिनाईत, निलेश सतिसेवक, भुपेंद्रसिंह बैस, मनिकराव झंझाड, बबनदास रामटेके, घनश्याम मरस्कोल्हे, संजय बुध्दे, छबिलाल पटले, शुक्राचार्य ठाकरे, छनुलाल मेश्राम, शामराव खोब्रागडे, शंकर बिंझाडे, वसीम शेख, जयप्रकाश पटले आदिंसह मोठ्या संख्येत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

