crime news : सख्ख्या भावाने केली, भावाची हत्या !
चिचगड गावातील घटना
देवरी : दारुच्या आहारी गेलेल्या थोरल्या भावाने नेहमी प्रमाणे घरी भांडण (crime news) केले. दरम्यान धाकट्या भावासोबत त्याचे भांडण झाले. त्यात झालेल्या मारहाणीत भावाच्या हातून भावाचीच हत्या झाली. ही घटना रविवार (ता.२१ डिसेंबर) च्या रात्री १० वाजेच्या सुमारास चिचगड येथे घडली. या घटनेत सचिन खेमराज राऊत (२५) असे मृतकाचे तर लोकेश खेमराज राऊत (२३) असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, चिचगड येथील राऊत कुटुंबातील सचिन व लोकेश हे दोघे भाऊ एकाच घरी राहत होते . त्यात (crime news) सचिन हा दारुच्या आहारी गेला होता. त्यामुळे रोज दारूच्या नशेत घरी भांडण करीत असे. काल रविवार (ता.२१ डिसेंबर) च्या रात्री त्याला नेहमी प्रमाणे सचिनने क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण केला. त्यामुळे लोकेशने समजविण्याचा प्रयत्न केला. त्यातच भांडण विकोप्याला पोहचले. लोकेश ने सचिनला जब्बर मारहाण केली. यात सचिनचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिचगड गावात एकच शोककळा परिसरील. (crime news) या घटनेची नोंद चिचगड पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

