पेंशन अदालत मध्ये पेंशन वर गाजली सभा..
उप मुख्य कार्यपालन अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिका-यांनी दोन दिवसात पेंशन देण्याचे दिले आश्वासन
गोंदिया:-शासन नियमानुसार दर महिण्याच्या एक तारखेला पेंशन करण्याचे आदेश असून सुद्धा वेळेवर पेंशन होत नाही या कारणावरुन आजच्या पेंशन अदालत मध्ये आधी पेंशन द्या असा सुर सर्व सेवानिवृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांने एक सूरात आवाज उचलला. 27 एप्रिल ला शासनाकडून पेंशन अनुदान आल्यावरही आता पर्यंत ट्रझरीमध्ये बिल का गेले नाही? कोणत्या विभागाकडून दिरंगाई होत आहे?दप्तर दिरंगाई चा नियम संबधीत लिपीकांवर का करण्यात येत नाही? अस अनेक प्रश्न सभेत मांडले. पेंशन विषयावर सभा गाजली. आवर उपस्थित सभा अध्यक्ष तथा उप मुख्य कार्यपालन अधिकारी पंचायत श्री वासनिक साहेब, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे व शिक्षणाधिकारी पवन खंडारे व लेखा अधिकारी अशोक बागडे यांनी दोन दिवसात पेंशन अनुदान पंचायत समितीला पाठविण्याचे आश्वासन दिले. व संबधीत पंचायत समितीच्या कर्मचा-यांना सूचना केली की अनुदान येण्यापूर्वीच सर्व पेंशन बील अद्यावत करुन ठेवण्याचे निर्देश दिले.
या पेंशन अदालतीचे अध्यक्ष म्हणून उप मुख्य कार्यपालन अधिकारी श्री वासनिक साहेब, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री जनार्दन खोटरे, शिक्षणाधिकारी श्री पवन खंडारे व लेखा अधिकारी अशोक बागडे व जिल्हा परिषद व पंचायत समितीतील संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पेंशन अदालत मध्ये अनेक विषयावर सविस्तर चर्चा करुन मार्ग काढण्यात आले त्यामध्ये डी सी तुळसीकर यांचे 15% प्रोत्साहन भत्ता प्रकरण निकाली काढणे, दुर्गाताई राघोर्ते यांची दुय्यम सेवापुस्तक तयार करणे, आरोग कर्मचाऱ्यांचे कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव 75 लोकांचे मंजूर झाले त्यांना आठ दिवसात आदेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, माध्यमिक शिक्षक, विस्तार अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांचे थकबाकी बील ट्रझरीत पाठविण्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगीतले, आरोग्य कर्मचाऱ्यां नक्षलभत्ता, सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता व इतर थकबाकी पाठविल्याचे सांगण्यात आले. सेवानिवृत कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीची काल्पनिक वेतन वाढ कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले, सेवानिवृत पदवीधर शिक्षकांना 1.1.2016 रोजी ची वेतन निश्चिती करतांना सुधारीत नियमानुसार वेतन देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले, 84 लोकांची मंजूर झालेली निवडश्रेणी यादी फेर सादर करण्यात यावे, टी बी भेंडारकर शिक्षण विस्तार अधिकारी यांची कोर्ट केश फाईल त्वरीत काढून निकाली काढण्यात यावे, निवड श्रेणी प्रस्ताव संदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी साहेबांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सभेत सांगीतले. शासकिय गट बिमा प्रकरण त्वरीत काढणे व काही वैयक्तिक प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आले. या पेंशन अदालत मध्ये सेवानिवृत संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष एल यु खोब्रागडे, उपाध्यक्ष डी सी तुळसीकर, डी टी कावळे, सुरेश आष्टीकर, अजय चौरे, बारेवार सर, टी एन बहेटवार, डी जी बिसेन, ठाकरे सर, जी एम के खान, तागडे सर , चावके सर, बारई सर,व अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

