LatestNewsगोंदिया

Shikshak din: शिक्षक दिनी आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार   

तिरोडा : नुसते लिहिता-वाचता येणे, म्हणजेच आपले नाव लिहिता येणे किंवा एखादे पत्र वाचता येणे, एवढ्यावर शिक्षणाची मर्यादा घालणे ही फार मोठी चूक आहे. कारण शिक्षण हा केवळ अक्षरज्ञानाचा विषय नसून तो मनुष्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. शिक्षण हा माणसाच्या विचारांना दिशा देणारा, मनाला घडवणारा आणि जीवनाला उन्नत करणारा प्रकाश आहे. जर एखाद्याला फक्त लिहिता-वाचता येत असेल पण त्याच्या वागणुकीत मूल्यं, आचारधर्म, समाजाशी नातं आणि विवेक नसेल, तर त्याला आपण खऱ्या अर्थाने शिक्षित म्हणू शकत नाही. खरे शिक्षण म्हणजे सत्य-असत्य यातील फरक ओळखता येणे चांगलं-वाईट याचा विचार करता येणे, समाजासाठी कर्तव्यभाव निर्माण होणे, सहिष्णुता, दया, करुणा, प्रामाणिकपणा यांचा अंगीकार करणे, इतरांचा आदर करणे आणि स्वतःचं व्यक्तिमत्त्व घडवणे, आजच्या युगात फक्त पदवी मिळवणे किंवा परीक्षा पास होणे हे शिक्षणाचे लक्षण नाही. खरे शिक्षण म्हणजे ज्ञानाला उपयोगात आणून जीवन समृद्ध करणे आणि समाजाला दिशा देणे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला खूप शास्त्र माहीत असेल पण त्याच्या आचरणात मानवता नसेल, तर त्याचे शिक्षण अपूर्ण ठरते. उलट एखाद्याने कमी शिकलं असेल पण तो सज्जन, प्रामाणिक आणि समाजाभिमुख असेल, तर तो खऱ्या अर्थाने शिक्षित आहे. महात्मा गांधींनी म्हटले आहे— “शिक्षण म्हणजे डोकं, हात आणि हृदय यांचा समतोल विकास होय.”म्हणूनच, आपल्याला केवळ लिहिता-वाचता येणे या पातळीवर थांबून चालणार नाही. आपल्याला मूल्याधिष्ठित शिक्षण, जीवनमूल्यं आणि संस्कार यांचा अंगीकार करून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत, जबाबदार आणि सजग नागरिक होणे गरजेचे आहे. शेवटी एवढंच म्हणेन “अक्षरज्ञान माणसाला दृष्टी देते,पण खरे शिक्षण त्याच्या जीवनाला दिशा देते.” असे प्रतीपादन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी केल.
(Shikshak din) शिक्षक दिनानिमित्त विधानसभा क्षेत्रातील आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार समारोह प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रामुख्याने अध्यक्षस्थानी डॉ.अनिल करवंदे,अध्यक्ष, अ.भा. क्रिडा व मानसशास्त्र संघटना तथा मा. प्राचार्य ई.देशमुख शा.शिक्षण महा.नागपूर उद्घाटक म्हणून डॉ. परिणय फुके मा. मंत्री तथा विधानपरिषद सदस्य लायकराम भेंडारकर अध्यक्ष, जि. प. गोंदिया, प्रेमकुमार रहांगडाले गोंदिया जिल्हाध्यक्ष रा.का.पा गोंदिया , सीताबाई रहांगडाले जिल्हाध्यक्ष, भाजप – गोंदिया, आमदार भजनदास वैद्य,  हेमंतभाऊ पटले, खोमेशभाऊ रहांगडाले , सभापती, रजनीताई कुंभरे , डॉ. लक्ष्मण भगत,   गिरधारी बघेले सभापती, कृऊबास, गोरेगाव संचालक, दि गो. डी. सेन्ट्रल बैंक दुर्गाप्रसादजी  ठाकरे,  डॉ.अविनाश  जायस्वाल संचालक, तेजराम  चव्हाण सभापती प. स. तिरोडा,  चित्रलेखा चौधरी सभापती प. स. गोरेगाव , जितेंद्र रहांगडाले सभापती, कृउबास तिरोडा , राजलक्ष्मीताई तुरकर महिला गोंदिया जिल्हाध्यक्ष रा.का.पा गोंदिया,  डॉ. वसंत भगत विधानसभा प्रमुख तिरोडा गोरेगाव, मदन पटले मा. उपाध्यक्ष जी.प.गोंदिया, ओम कटरे जिल्हाध्यक्ष, भाजयुमो गोंदिया, भाऊराव कठाणे उपाध्यक्ष, भाजपा गोंदिया जिल्हा, संजय बारेवार उपाध्यक्ष, भाजपा गोंदिया जिल्हा, सुनंदा पटले उपसभापती, प.स. तिरोडा, रवींद्र वहिले मंडळ अध्यक्ष, भाजप ठाणेगाव, संतोष चौधरी मंडळ अध्यक्ष, भाजप अर्जुनी, नितीन पराते शहरअध्यक्ष, भाजप तिरोडा, प्रमोद पटले मंडळअध्यक्ष, भाजपा दवनीवाडा मंडळ, अनंता ठाकरे मंडळ अध्यक्ष, भाजपा गोरेगाव मंडळ, आशिष बारेवार मा. नगराध्यक्ष, गोरेगाव, भूमेश्वर रहांगडाले उपसभापती कृबास तिरोडा,  जी.प.सदस्य तुमेश्वरी बघेल,  ऍड.माधुरी रहांगडाले, जी.प.सदस्य चत्रभूज बिसेन,  प्रवीण पटले, अंजली अटरे,  विजय उके,  किरण पारधी जगदीशजी बावनथडे सौ अश्विनीताई पटले,  हुपराज जमईवार सदस्य, प. स. तिरोडा प.स.सदस्य डॉ.चेतलाल भगत, सौ.ज्योती शरणागत, सौ.दिपाली टेंभेकर, सौ. प्रमिला भलाई,  सौ. कविता सोनेवाने, सौ. कुंता रामप्रकाश पटले, सदस्य किशोर पारधी,  अजाब रीनाईत , वंदना पटले, सुप्रिया गणवीर,  विजय बिन्झाडे, जितेंद्र चौधरी,  तिरोडा शंकरलाल टेंभरे, सभापती अशोक असाटी, महिला मोर्चा शहरअध्यक्ष पौर्णिमा शर्मा, कृबास संचालक मिलिंद कुंभरे, घनशाम पारधी, जयप्रकाश गौतम, व मोठ्या संख्येने विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते व पदाधिकारी, सेवा निवृत्त शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमाशंकर पारधी, यु.पी.बिसेन, सुनील ठाकरे, नंदलाल पारधी, नरेंद गौतम  यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *