Latestगोंदियाविदर्भशैक्षणिक

वर्धा संवाद कार्यशाळेत महावीर मारवाडी हायस्कूलचे विद्यार्थी चमकले

गोंदिया : आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा येथील सेवाग्राम येथील बापू कुटी येथील यात्री निवास येथे किशोर सशक्तीकरण या विषयावर विभागीय संवाद कार्यशाळेचे आयोजन १५ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेला युनिसेफ यांचे भरीव योगदान लाभले.
कार्यशाळेत मुंबईहून आलेल्या आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ अंजू उप्पल, डॉ.संदीप सांगले व नागपुर विभागाचे उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर यांनी रिसोर्स पर्सन म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमात नागपूर विभागातील विविध जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. कार्यशाळेत गोंदिया जिल्ह्यातील श्री महावीर मारवाडी शाळेतील इयत्ता नववीच्या पाच विद्यार्थिनी आणि इयत्ता दहावीच्या पाच विद्यार्थिनींनी सहभाग घेवुन आपली चमक दाखविली.यावेळी त्यांचेसोबत शाळेचे प्रभारी शिक्षक प्रशांत वासनिक व सनी भादुपोते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोंदिया येथील आरोग्य विभागाच्या टीममध्ये जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत, जिल्हास्तरीय अर्श कार्यक्रमाचे समन्वयक सपना ठाकरे, राष्ट्रीय किशोर स्वस्थ कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ.संदीप व आशा सेविका बबिता मेश्राम यांचे महत्त्वाचे योगदान होते. शाळेचे मुख्याध्यापक अजय शामका यांच्या पूर्ण सहकार्यामुळे हा सहभाग शक्य झाला. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी विशेषत: आरोग्य विभागाच्या टीम गोंदियाने उल्लेखनीय पुढाकार घेतला.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध संवादात्मक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्कृष्ट सहभाग दर्शविला. यासोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलही पार पडली, त्यात त्यांनी वर्ध्यातील प्रमुख ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. विशेषत: सेवाग्राम आश्रमातील बापूंच्या झोपडीत विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित अनेक ऐतिहासिक घटनांची माहिती मिळाली. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आरोग्य जागृती आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा उपक्रम ठरली. या यशस्वी कार्यशाळेबद्दल संस्थेचे अध्यक्ष सीताराम अग्रवाल आणि संस्था सचिव प्रकाशचंदजी कोठारी यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि भागीदार संस्था यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *