LatestNewsगोंदिया- भंडारा

Shri Hanumant Katha :  हनुमंत कथा भव्य शोभायात्रेची जोरदार तयारी

२१ ते २३ डिसेंबरला डी.बी. सायन्स महाविद्यालयात तीन दिवसीय हनुमंत कथेचे आयोजन
गोंदिया :
भगवान श्री हनुमानाच्या कृपेने शहरात धार्मिक उत्साहाची लहर उसळली असून, (Shri Hanumant Katha ) हनुमंत कथेच्या भव्य आयोजनाच्या तयारी जोरात सुरू झाली आहे. खासदार श्री प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांच्या वतीने २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत डी.बी. सायन्स महाविद्यालयाच्या परिसरात तीन दिवसीय हनुमंत कथा आयोजित करण्यात आली आहे. या पवित्र कथेचे वाचन वृंदावन सिद्धपीठाचे सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या अमृत वाणीतुन होणार आहे, ज्यामुळे भक्तांमध्ये अपार उत्साह आहे.
(Shri Hanumant Katha )  धार्मिक कार्यक्रमासाठी आयोजन समिती सतत कार्यरत असून, गोंदिया शहर आणि परिसरातील भक्तगण, सामाजिक संस्था व गणमान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. २१ डिसेंबरला दुपारी १.३० वाजता माँ दुर्गा मंदिर, दुर्गा चौक येथून गुरुजींच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत भगवान हनुमानाची प्रतिमा, झांबरे, ढोल-ताशे, भक्ती गीतांद्वारे धार्मिक व भक्तिमय वातावरणात खासदार श्री प्रफुल पटेल, सौ. वर्षाताई पटेल व इतर अनेक गणमान्य व्यक्ती, भक्त उपस्थित राहतील. शोभायात्रा डी.बी. सायन्स महाविद्यालयापर्यंत पोहोचेल, जेथे कथेचा शुभारंभ होईल. या धार्मिक महोत्सवासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या असून, मंडप सजावट, स्वागत, भोजन व्यवस्था, सुरक्षा यासाठी सर्वजण परिश्रमपूर्वक कार्यरत आहेत. हनुमंत कथेच्या श्रवणाने भक्तांना आध्यात्मिक शांती व हनुमानजींची कृपा लाभेल, असा विश्वास आयोजकांचा आहे. शहरातील सर्व भक्तगण, सामाजिक संस्था व नागरिकांना या भव्य आयोजनाचा लाभ घेण्याबाबत हार्दिक आमंत्रित केले आहे. तीन दिवसीय हनुमंत कथा दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *