LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

maharashtra winter session 2025 : राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान व पेसा मोबिलायजर कर्मचार्‍यांची विधी मंडळावर धडक

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली दखल
१५ दिवसात समस्या मार्गी लावणार
सालेकसा :
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान व पेसा ग्रामसभा मोबिलायजर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे सुरू असलेल्या (maharashtra winter session 2025)  हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य महामोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्याच्या कानाकोपर्‍यातून कंत्राटी कर्मचार्‍यांचा मोठा जनसागर उसळला होता. या महामोर्चाची गंभीर दखल घेत ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. या चर्चेनंतर मागण्या पंधरा दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
(maharashtra winter session 2025)  राज्यात कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांवर सुरू असलेल्या अन्याय व शोषणाचा मुद्दा या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, दिल्ली या कंपनीने १ नोव्हेंबर रोजी ई-मेलद्वारे कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता राज्यातील सुमारे ५०० कर्मचार्‍यांना ३० सप्टेंबरपासून कार्यमुक्त केल्याची माहिती दिल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, संबंधित कर्मचार्‍यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत नियमितपणे कामकाज केले असतानाही त्यांना कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ना शासनाकडून, ना संबंधित कंपनीकडून याबाबत स्पष्ट भूमिका घेण्यात आली नसल्याने शासनाने या प्रकरणात पूर्णतः हात झटकले असल्याचा आरोप कर्मचार्‍यांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत नियुक्त कंत्राटी कर्मचार्‍यांचे विविध खासगी कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर शोषण सुरू असल्याचा गंभीर आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार वेळेवर मानधन न देणे, नियमबाह्य कपाती, दोन ते तीन महिने मानधन रोखून धरणे, वारंवार कंपन्या बदलून कर्मचार्‍यांची सेवा अस्थिर करणे, तसेच विमा व सामाजिक सुरक्षा सुविधा न देणे अशा गंभीर बाबींमुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विशेषतः पेसा ग्रामसभा मोबिलायजर यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे या आंदोलनातून ठळकपणे समोर आले आहे. किमान वेतन, सेवा संरक्षण किंवा नोकरीची कोणतीही लेखी हमी नसताना त्यांच्याकडून मोठ्या जबाबदार्‍या पार पाडून घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. (maharashtra winter session 2025)  यावेळी गोंदिया जिल्ह्यातील प्रकाश तिरेले जिल्हा व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनात रोहित बन्सोड, सर्वश्री तालुका व्यवस्थापक पवन पाथोडे, नागेश बघेले, रंजीत बघेले, शुभांगी मेश्राम, पुजा ठाकुर, पुनम मेश्राम, लेखा सहाय्यक/डेटा इंजि. नविनकुमार राहुल, आशीष बोपचे, ललित बिसेन, विकास भज्जे, कृष्णाकुमार भायदे, कु.टिंकल मेश्राम यांनी उपस्थिती दर्शवून मोर्चाचे नेतृत्व केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *