जश्ने ईद मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वावर खासदार राजेंद्र जैन यांनी दिल्या शुभेच्छा!
रेलटोली येथील राष्ट्रवादी भवनसमोर ईदच्या भव्य मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत
मिरवणुकीचे सदर ईशान शेख यांचा सत्कार
गोंदिया: जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी या पवित्र आणि आनंदाच्या सणानिमित्त गोंदियात भव्य मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. या मंगलप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदियाच्या वतीने रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर मिरवणुकीचे भव्य व उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार राजेंद्र जैन यांनी मिरवणुकीचे सदर ईशान शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक स्वागत केले आणि सर्व मुस्लिम बांधवांना जश्ने ईद मिलाद-उन-नबीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी खासदार राजेंद्र जैन म्हणाले की, “ईद मिलाद-उन-नबी हा सण प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. आपल्या गोंदिया शहरात सर्व सण सर्वधर्मसमभावाच्या आणि ऐक्याच्या वातावरणात साजरे करण्याची गौरवशाली परंपरा राहिली आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येवो.” असे व्यक्त केले.
या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार राजेंद्र जैन, विनोद हरीणखेडे, राजू एन. जैन, केतन तुरकर, नानू मुदलियार, अशोक सहारे, भगत ठकरानी, दिनेश अग्रवाल, सतीश देशमुख, राज शुक्ला, लोकेश यादव, अनुज जायस्वाल, संजीव राय, नागो बनसोड, अमित भालेराव, मोहन पटले, विनीत शहारे, खालील पठाण, हरबक्ष गुरनानी, पाशा शेख, इरफान शेख, बंटी चौबे, लिकेश चिखलोंडे, सुनील पटले, शैलेश वासनिक, विनायक खैरे, प्रशांत सोनपूरे, लव माटे, दिनेश गेडाम, रवी रामटेककर, हरिराम आस्वामी, हरगोविंद चौरसिया, पंकज मिश्रा, विक्रांत मिश्रा, हर्षवर्धन मेश्राम, योगेश दर्वे, सचिन अवस्थी, शरणागत गुरुजी, श्रेयस खोब्रागडे, प्रदीप लांजेवार, गुड्डू बिसेन, संजीव बापट, तुषार उके, क्षितिज जांगडे, डुलीचंद मेश्राम, सौरभ जायस्वाल, चिराग बावनथडे, वामन गेडाम यांच्यासह बहुसंख्य मुस्लिम बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


