तलावात आढळला तरुणाचा मृतदेह; घातपात की, आत्महत्या? तपास सुरू

माँ धुकेश्वरी मंदिर परिसरातील पवन तलावातील घटना.
देवरी, :- शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या माँ.धकेश्वरी मंदिर परिसरात असलेल्या पवन तलावात एका युवकाचा मृतदेह तरंगताना परिसरातून जाणाऱ्या नागरीकांना दिसला असता, नागरीकांनी तात्काळ देवरी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच देवरी पेलिसानीं घटना स्थळ गाठत तपासणी केली असता, सदर मृत व्यक्ती हा देवरी येथील सांरग पुरूषोत्तम देशपांडे (वय २९) रा. देवरी, असल्याची ओळख पटली. ज्यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
सविस्तर असे की,आज शुक्रवार रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास सदर घटना निदर्शनात येताच सारंग ची हत्या की, आत्महत्या या चर्चेला उधान आले आहे. सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून, ग्रामीण रुग्णालयात देवरी येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले आहे. सारंग देशपाडें याची हत्या कि, आत्महत्या हे शविच्छेदनानंतर समजुन येणार असून या घटनेने देशपांडे व मित्र परीवारात शोककळा पसरली आले.देवरी पोलीस पुढील तपास करीत आहे.

